शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

समुद्रात बुडून विदेशी पर्यटकाचा मृत्यू::रशियन पर्यटक

By admin | Published: January 02, 2015 11:40 PM

ब्लादिनीर लिओनोव्ह (वय २४) या विदेशी पर्यटकाला पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने

शिरोडा : शिरोडा वेळागर येथील समुद्रात गेलेल्या ब्लादिनीर लिओनोव्ह (वय २४) या विदेशी पर्यटकाला पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. नववर्षाच्या स्वागतासाठी गोवा व सिंधुदुर्ग परिसरात अनेक देशी-विदेशी पर्यटक दाखल झाले आहेत. गुरुवारी रेडी हुडावाडी येथे विदेशी पर्यटकाची दुचाकी घसरुन गंभीर जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच आज सायंकाळी शिरोडा वेळागर येथील समुद्रकिनारी मौजमजा करणाऱ्या रशियन पर्यटकाला पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला. रशियन पर्यटक ब्लादिनीर लिओनोव्ह व त्याची मैत्रिण कॅटरिना (२४) हे गोवा येथून सिंधुदुर्ग पर्यटनासाठी आले होते. ते सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शिरोडा वेळागर समुद्रात मौजमजा करण्यासाठी आले. याच दरम्यान ओहोेटीचा वेळ असल्याने ब्लादिनीर याला पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही. यामुळे तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर गटांगळ्या खात वाहून जाऊ लागला. त्याची मैत्रिण कॅटरिना हिच्या ही बाब लक्षात येताच तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तेथील हॉटेल व्यावसायिक अजय अमरे व मदन अमरे यांनी ब्लादिनीरला पाण्याबाहेर काढले. त्याला तत्काळ शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ब्लादिनीरचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. या घटनेचा पंचनामा सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होता.(प्रतिनिधी)