शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live:रतन टाटांची अंत्ययात्रा ४ वाजता; वरळी येथील स्मशानभूमीत पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार
2
अमेरिकेनं इस्रायलला एक वर्षात दिले 18,47,15,19,00,000 रुपयांचे शस्त्रास्त्र! लिस्ट बघून धक्का बसेल, डोकं गरगरेल
3
रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला केंद्रातून अमित शाह येणार; पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर
4
आजारी कर्मचाऱ्याला पाहायला पुण्याला गेले; हा एकच किस्सा रतन टाटांच्या कामाची पद्धत सांगून जातो
5
संजय राऊतांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल; लाडकी बहीणविषयी केलेलं वक्तव्य पडलं महागात
6
कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी विमान उडवायला तयार झाले होते रतन टाटा, नेमकं काय घडलं होतं? पुण्यातला आहे किस्सा
7
निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत गटबाजी; मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू?
8
Ratan Tata Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले रतन टाटा; दानच ९००० कोटींवर केलेले...
9
अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातून रतन टाटांनी घेतली होती बॉलिवूडमध्ये एन्ट्री, पण सिनेमा फ्लॉप ठरला अन्...
10
बापरे! विमान तब्बल ३४००० फूट उंचीवर असतानाच पायलटचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
11
'ताज' बाहेरचे 'ते' कुत्रे आज पुन्हा पोरके झाले...टाटांनी मिळवून दिली होती हक्काची जागा!
12
Congo Fever : राजस्थानमध्ये खतरनाक आजाराची एन्ट्री; कांगो तापाने महिलेचा मृत्यू, सरकारने जारी केला अलर्ट
13
Ratan Tata : रतन टाटांनी देशासाठी एवढे केले, जे कुणालाही जमणार नाही; सच्च्या देशभक्ताच्या या दहा गोष्टी...
14
'फक्त कंपनीला नाव नाही तर देशाला कीर्ती दिली..'; रतन टाटांच्या निधनानंतर दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
15
"हे टाटाच्या डीएनएमध्ये आहे...!" रतन टाटा यांची इच्छा, चेअरमन पद; लोकांना देत होते केवळ एकच सल्ला!
16
रतन टाटा यांच्या प्रेमात होती 'ही' बॉलिवूड अभिनेत्री, निधनानंतर शेअर केली भावुक पोस्ट, म्हणते- "तुम्ही गेलात पण..."
17
Donald Trump : "मोदी महान आहेत, ते वडिलांसमान वाटतात"; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक
18
Ratan Tata : रतन टाटांवर सरस्वती आणि लक्ष्मीचा वरदहस्त कायम असण्यामागे होते 'हे' कारण!
19
रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर; कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत
20
असा माणूस पुन्हा होणे नाही! रतन टाटांच्या निधनानंतर रितेश देशमुखने ट्वीट करत वाहिली श्रद्धांजली

डीआरएस-८७ योजनेच्या घरांवर डल्ला?

By admin | Published: January 17, 2017 3:04 AM

सिडकोच्या डीआरएस-८७ योजनेतील विविध कारणांमुळे विक्रीअभावी पडून असलेली शेकडो घरे हडप करण्यात आली

कमलाकर कांबळे,नवी मुंबई- सिडकोच्या डीआरएस-८७ योजनेतील विविध कारणांमुळे विक्रीअभावी पडून असलेली शेकडो घरे हडप करण्यात आली आहेत. सिडको अधिकारी व दलालांनी संगनमताने या घरांवर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. सिडकोचा मार्केटिंग विभाग या संपूर्ण घोटाळ्याच्या केंद्रस्थानी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या विभागाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.सिडकोच्या घरांना ग्राहकांची नेहमीच पसंती राहिली आहे. त्यानुसार सिडकोने आतापर्यंत शहराच्या विविध भागात जवळपास पावणेदोन लाख घरांची निर्मिती केली आहे. असे असले तरी १९८७ साली जाहीर केलेली डिमांड रजिस्ट्रेशन सर्व्हे अर्थात डीआरएस ही योजना पूर्णत: फसली. या योजनेअंतर्गत सिडकोने शहरातील सात नोडमध्ये गृहप्रकल्प प्रस्तावित केले होते. त्यासाठी ग्राहकांकडून आगाऊ घरांसाठी नोंदणी करण्यात आली होती. या योजनेला जवळपास ५५ हजार ग्राहकांनी प्रतिसाद दिला होता. या योजनेअंतर्गत विविध उत्पन्न गटांतील ग्राहकांसाठी गृहनिर्मिती प्रस्तावित करण्यात आली होती. परंतु विविध कारणांमुळे ही योजना फेल ठरली. योजना जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष घरांची निर्मिती, पात्र ग्राहकांना घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया रेंगाळली. यातच सिडकोने वेळोवेळी घरांच्या किमतीत वाढ करून संबंधित ग्राहकांकडून त्याची आकारणी सुरू केली. त्यामुळे नियमानुसार नियमित हप्ते भरून देखील अनेकांचे घरांचा ताबा घेतला नाही. तर वेळोवेळी वाढविलेल्या किमतीमुळे काहींनी स्वत:हून ही घरे घेण्यास नकार दिला. रद्द झालेली व ग्राहकांनी स्वत:हून सरेंडर केलेली जवळपास अडीच ते तीन हजार घरे सिडकोकडे शिल्लक असणे अपेक्षित होते. परंतु सिडकोच्या मार्केटिंग विभागाकडे या घरांचा कोणताही तपशील नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घरे गेली कुठे, त्यांचा तपशील जाहीर केला का जात नाही, याबाबत सिडकोत सोयीस्करपणे चुप्पी साधली जात असल्याचे दिसून आले आहे.डीआरएस-८७ या योजनेतील घरांच्या घोटाळ्यात सिडकोचा मार्केटिंग विभाग आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. कारण कोणत्याही कारणांमुळे रद्दबातल ठरविलेल्या मालमत्तांची विल्हेवाट लावण्याचे संपूर्ण अधिकार मार्केटिंग विभागाकडे आहेत. ही वस्तुस्थिती असताना डीआरएस योजनेची घरे कोणाच्या घशात गेली, असा सवाल उपस्थित केला जात आहे.नियमाने नवी मुंबईत एक घर नावावर असेल तर दुसरे घर घेता येत नाही. मात्र सिडकोचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावांवर एकापेक्षा अनेक घरे आहेत. दलालांशी संगनमत करून काहींनी तर आपले नातेवाईक, मित्रमंडळींच्या नावावर मोठ्याप्रमाणात बेनामी मालमत्ता करून ठेवली आहे. यासर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.साडेबारा टक्के भूखंड वाटप योजनेतील कथित भ्रष्टाचारामुळे सिडको महामंडळ बदनाम झाले आहे. मागील तीन साडेतीन वर्षात सिडकोने या विभागाच्या कारभारात पारदर्शकता आणली आहे. भ्रष्टाचाराचा कलंक पुसून टाकण्यात या विभागाला काही प्रमाणात यश आले आहे. मात्र भ्रष्टाचाराचे कुरण ठरलेल्या मार्केटिंग विभागाकडे मात्र व्यवस्थापनाचे दुर्लक्ष झाले आहे. ही बाब या विभागात वर्षानुवर्षे रुजलेल्या भ्रष्ट प्रवृत्तीला पोषक ठरल्याचे चित्र आहे. >नियमाला फासला हरताळएखादा ग्राहक देण्यात आलेल्या वाढीव मुदतीनंतरसुध्दा घरांचे हप्ते न भरू शकल्यास सिडकोच्या नियमानुसार अटी व शर्तीच्या आधारे या घराचे वाटप रद्द केले जाते. रद्द केलेल्या या मालमत्तेची विल्हेवाट लावण्यासाठी सिडकोची स्वतंत्र नियमावली आहे. नवी मुंबई डिस्पोझल आॅफ लॅण्ड या नावाने ही नियमावली ओळखली जाते. १९७५ सालीच्या मूळ नियमावलीत १९९९ व २00८ अशी दोन वेळा सुधारणा करण्यात आली. परंतु विविध कारणांमुळे वाटप रद्द झालेल्या मालमत्तांची विल्हेवाट लावताना ही नियमावली धाब्यावर बसविल्याचे दिसून आले आहे. >घर परत मिळविण्यासाठी महिलेचा संघर्षशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या जनाबाई बंशी साळवे या महिलेला डीआरएस-८७ योजनेअंतर्गत नवीन पनवेल येथे घराचे वाटप झाले आहे. २३ जानेवारी १९९६ रोजी त्यांनी रीतसर सिडकोबरोबर विक्री करार केला. तत्पूर्वी सिडकोचे हप्ते भरण्यास पैसे कमी पडल्याने त्यांनी सिडकोच्या मार्केटिंग विभागातील एका महिला अधिकाऱ्याकडे विचारणा केली. त्यानुसार या अधिकारी महिलेने जनाबाई यांना दहा हजार रुपये उधार दिले. परंतु त्याबदल्यात आपल्या भावाच्या नावावर तिच्याकडून अधिकारपत्र लिहून घेतले. तेव्हापासून हे घर या महिला अधिकाऱ्याच्या ताब्यात आहे. आपले घर परत मिळविण्यासाठी जनाबाई यांचा गेल्या वीस वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. काही किरकोळ रक्कम घेवून या घरावरील अधिकार सोडावा, यासाठी आपल्यावर दबाव आणला जात असल्याचे आरोप जनाबाई यांनी केला आहे.