मुंबई : औषधांचे संपूर्ण पाकीट विकत घेण्याऐवजी लवकरच रुग्णांना गरजेनुसार औषध खरेदी करता येणार आहे. त्यामुळे संपूर्ण पाकीट विकत घेण्याची सक्ती रुग्णांना करता येणार नाही. याविषयी नुकतेच अन्न व औषध प्रशासन विभागाने औषध विक्रेत्यांना निर्देश दिले आहेत. तसेच, नुकतेच ड्रग कंट्रोलर जनरल आॅफ इंडियालाही एफडीएने पत्र पाठवून त्यात औषधांची छोटी पाकिटे तयार करण्याविषयी निवेदन दिले होते.अन्न व औषध प्रशासनाच्या या निर्णयामुळे औषधांचा अपव्यय आणि दुष्परिणामांना आळा बसेल, असे आॅल केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने सांगितले.अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त अर्जुन खडतरे म्हणाले की, अनेकदा रुग्णांना कमी मात्रा लागते. परंतु, औषध विक्रेत्यांना औषधांच्या स्ट्रिप्स कापणे शक्यत नसते. औषधांच्या स्ट्रिप्स कापल्यामुळे बºयाचदा त्या पाकिटावरील तारीख, बॅच क्रमांक, एक्स्पायरी डेट कापले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आम्ही ड्रग कंट्रोलर जनरल आॅफ इंडियाला संपूर्ण माहिती असलेली औषधांची छोटी पाकिटे बनविण्याविषयी पत्र लिहिले आहे.
आता मिळणार गरजेनुसार औषध , पूर्ण पाकीट घेण्याची सक्ती नाही : एफडीए
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 4:20 AM