शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

ड्रगमाफिया कोमील मर्चंटला अखेर गोव्यातून अटक, पोलिसांशी असलेल्या संबंधांचा घेतला गैरफायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 2:44 AM

मुंब्य्रातील मोठा ड्रगमाफिया म्हणून उदयास आलेला, एके काळचा पोलिसांचा खबरी कोमील मर्चंट याला ठाण्याच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अखेर बेड्या ठोकल्या. कोमीलच्या मुद्द्यावर गेल्या काही दिवसांपासून वातावरण चांगलेच तापले होते.

राजू ओढे ठाणे : मुंब्य्रातील मोठा ड्रगमाफिया म्हणून उदयास आलेला, एके काळचा पोलिसांचा खबरी कोमील मर्चंट याला ठाण्याच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अखेर बेड्या ठोकल्या. कोमीलच्या मुद्द्यावर गेल्या काही दिवसांपासून वातावरण चांगलेच तापले होते.मुंब्रा येथील कोमील मर्चंट याचा गेल्या काही वर्षांपासून अमली पदार्थविरोधी पथकासह ठाण्याच्या संपूर्ण पोलीस यंत्रणेत खबरी म्हणून बºयापैकी वावर होता. अमली पदार्थ तस्करीची गोपनीय माहिती त्याने अनेकदा पोलिसांना पुरवली. त्याने तंतोतंत माहिती दिल्याने अमली पदार्थविरोधी पथकाने अनेक कारवाया यशस्वीरीत्या केल्या. गत महिन्यात अमली पदार्थविरोधी पथकास मुंब्रा येथील अमली पदार्थ तस्करीची गोपनीय माहिती अन्य एका खबºयाकडून मिळाली होती. पोलिसांनी या कारवाईमध्ये दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ७५ ग्रॅम मेफेड्रिन हस्तगत करण्यात आले होते. या आरोपींच्या चौकशीतून कोमीलचे नाव समोर आल्यानंतर पोलीस यंत्रणाही क्षणभर हादरली होती.काही वर्षांपूर्वी कोमील मुंब्रा येथे भंगारविक्रीचा व्यवसाय करायचा. हळूहळू तो पोलिसांच्या संपर्कात आला. त्याने या भागातील अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना पुरवण्यास सुरुवात केली. अमली पदार्थांची तस्करी करणाºया अनेक लहान-मोठ्या गुन्हेगारांना पोलिसांनी त्याच्या माहितीवरूनच गजाआड केले. सूत्रांच्या मतानुसार यामागे कोमीलचे कपट दडलेले होते. त्याने एकीकडे अमली पदार्थांच्या तस्करांचे पत्ते पोलिसांच्या मदतीने साफ करताकरता स्वत: या गोरखधंद्यात पाय रोवले. पोलिसांशी असलेल्या संबंधांचा त्याने पुरेपूर गैरफायदा घेतला. पोलिसांच्या कारवायांची पद्धत बारकाईने ठाऊक असल्याने पोलीस शिपायापासून वरिष्ठांकडे ऊठबस असलेल्या कोमीलने लवकरच या धंद्यात जम बसवला. गत महिन्यात अमली पदार्थाच्या एका गुन्ह्यामध्ये कोमीलचे नाव समोर आल्यानंतर चांगलेच वादळ उठले होते. राजकीय वर्तुळातही वजन असलेल्या कोमीलविरोधात आठ दिवसांपूर्वी मुस्लिम धर्मगुरूंनी मुंब्रा येथे पत्रकार परिषद घेऊन कठोर कारवाईची मागणी केली होती. तेव्हापासून अमली पदार्थविरोधी पथकाने त्याच्या अटकेसाठी कंबर कसली होती. मुंब्रा येथे गेले आठ दिवस पोलिसांनी पाळत ठेवून काहीच उपयोग झाला नाही. अखेर, गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर अमली पदार्थविरोधी पथक गोवा येथे पाठवण्यात आले होते. तेथून कोमीलला अटक करण्यात आली. या कारवाईचा नेमका तपशील समोर आला नसला, तरी वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटकthaneठाणेPoliceपोलिस