शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

Sameer Wankhede vs Nawab Malik: रेस्टॉरंटच्या जेवणासोबत क्रूझवर ड्रग्ज पोहोचविले गेले; नवाब मलिकांचा धक्कादायक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 9:43 AM

Aryan Khan Drug Case: वानखेडेंचा खरा चेहरा लोकांसमोर उघड करणार, प्रसिद्धीसाठीच आर्यनवर कारवाई : नवाब मलिक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ड्रग्जप्रकरणी क्रूझवर कारवाई करताना एनसीबीचे समीर वानखेडे यांनी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सोबत न घेता स्वत: तयार केलेल्या प्रायव्हेट आर्मीचा उपयोग केला. ही बाबसुद्धा भविष्यात सिद्ध करून वानखेडेंचा खरा चेहरा जनतेसमोर उघड करणार असल्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी येथे स्पष्ट केले.

आर्यन खानला एनसीबीने खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केला. वानखेडे यांनी केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठीच हा सर्व खटाटोप केला. स्वत:ची प्रायव्हेट आर्मी तयार करून दहशत निर्माण केली. त्यांनी यापूर्वीदेखील अनेक सेलिब्रिटींना बोगस प्रकरणांत अडकवले. आर्यनवर कारवाई केली, त्या दिवसापासून मी हे फेक प्रकरण असल्याचे म्हटले होते. आर्यनला यापूर्वीच जामीन मिळायला हवा होता. खूप उशिराने जामीन मिळणे म्हणजे हा आर्यनवर अन्यायच होय. आर्यन  प्रकरणातील सत्य निश्चितपणे सर्वांसमोर येईल, असे ते म्हणाले. 

रेस्टॉरंटच्या जेवणासोबतच असे गेले क्रूझवर ड्रग्ज  दरम्यान, क्रूझवरील ड्रग्ज पार्टीमध्ये एका रेस्टॉरंटमधून जे जेवण गेले त्यातूनच ड्रग्ज गेले होते. याबाबतचे सगळे पुरावे समोर आणणार असल्याचेही मलिक यांनी सांगितले. कालच फर्निचरवाला नावाच्या मुलीने तिच्या बहिणीला कसे अडकवण्यात आले, हे सांगितले आहे. या प्रकरणाचा आणखी मोठा उलगडा होईल, असेही ते म्हणाले.

नवाब मलिकांना मी खिशात ठेवतो;  सर्वसामान्य माणूस वानखेडे यांच्या पाठीशी - चंद्रकांत पाटील तळेगाव दाभाडे (पुणे) :  समीर वानखेडे हा माझा जावई नाही आणि भाजपचा देखील जावई नाही. वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यात जे सुरू आहे ते सुरू राहावे; परंतु सर्वसामान्य माणूस हा वानखेडे यांच्या मागे उभा आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील येथे म्हणाले. नवाब मलिकांना मी खिशात ठेवतो, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.nमावळातील तळेगाव दाभाडे येथील एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील सहभागी झाले होते. त्यावेळी नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यात सुरू असलेल्या वाक्युद्धाविषयी पाटील यांना विचारले असता, त्यांनी मलिकांवर टीका केली. यावेळी पाटील म्हणाले, ‘सर्वसामान्य माणूस वानखेडे यांच्या मागे उभा आहे. मलिकांनी जास्त परीक्षा घेऊ नये. कारण समाज हा नेहमी ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्या पाठीशी असतो हे ध्यानात ठेवावं.’ मलिक दररोज भाजपवर टीका करीत आहेत, यावर पाटील म्हणाले, ‘नवाब मलिकांना मी खिशात ठेवतो.’

टॅग्स :Mumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोSameer Wankhedeसमीर वानखेडेnawab malikनवाब मलिक