मुंबई - राज्यात शुक्रवार पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली असून राज्यात पहिल्याच दिवशी 5434 जणांनी या सेवेचा लाभ घेतला. त्यामधील 4 हजार 875 ग्राहक केवळ नागपूर व लातूर या दोन जिल्ह्यातील आहेत.राज्यात 4159 देशी दारु विक्रीची दुकाने आहेत त्यापैकी 1938 दुकाने सुरु आहेत. विदेशी मद्यविक्रीची (वाईन शॉप) 1685 दुकाने आहेत त्यापैकी 530 सुरु होती. बीअर शॉपची 4947 दुकाने आहेत त्यापैकी 2129 सुरु होती अशा प्रकारे राज्यात 10 हजार 791 मद्यविक्रीची दुकाने आहेत त्यापैकी 4 हजार 597 सुरु होती. गुरुवारी राज्यात 84 गुन्हे नोंदवण्यात आले व 45 जणांना अटक करण्यात आली.यामध्ये 22 लाख 62 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. लॉकडाऊन कालावधीत 24 मार्च ते 14 मे या कालावधीत 5 हजार 489 गुन्हे नोंदवण्यात आले. त्यामध्ये 2457 आरोपींना अटक करण्यात आली. तर 554 वाहने जप्त करण्यात आली व 14 कोटी 93 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
होम डिलिव्हरीच्या पहिल्याच दिवशी तळीरामांच्या उड्या; 'हे' दोन जिल्हे सर्वात पुढे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 9:47 PM
गुरुवारी राज्यात 84 गुन्हे नोंदवण्यात आले व 45 जणांना अटक करण्यात आली.
ठळक मुद्देलॉकडाऊन कालावधीत 24 मार्च ते 14 मे या कालावधीत 5 हजार 489 गुन्हे नोंदवण्यात आले. 554 वाहने जप्त करण्यात आली व 14 कोटी 93 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.