शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
5
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
6
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
8
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
9
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
10
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
11
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
12
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
13
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
15
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
16
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
17
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
18
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
19
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस

वळवाच्या पावसाने भातपेरण्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2017 1:08 AM

भोर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भाटघर धरणभागात मागील आठवड्यात झालेल्या वळवाच्या पावसामुळे भाताच्या पेरण्या झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कभोर : भोर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भाटघर धरणभागात मागील आठवड्यात झालेल्या वळवाच्या पावसामुळे भाताच्या पेरण्या झाल्या आहेत. तर मागील दोन दिवसांत झालेल्या वळवाच्या पावसाने नीरा देवघर धरण भागातील हिर्डोशी खोऱ्यात भाताच्या पेरण्या सुरु झाल्या आहे. अजून दमदार पावसाची गरज असल्याने काही ठिकाणच्या पेरण्या रखडल्या आहेत. भोर शहरातील खते व बियाणांच्या दुकानात बी खरेदीसाठी शेतकऱ्यांनी एक गर्दी केली आहे.तालुक्याच्या पश्चिम भागात दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात वळवाचे दोन-तीन दमदार पाऊस झाल्यावर रोहिणी नक्षत्रावर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात धूळवाफेवर भाताच्या बियांची पेरणी केली जाते. मात्र या वेळी एप्रिल आणि मे महिन्यात वळवाचे पाऊस न झाल्याने भाताच्या पेरण्या १५ दिवस पुढे गेल्या आहेत. तर भोरपासून सुमारे ५५ किलोमीटरवर असलेल्या चांदवणे, बोपे, कुंबळे, खुलशी, गृहिणी, भुतोंडे, डेरे, मळे, कुरुंजी, कांबरे खुर्द-बुद्रुक या भागांत मागील आठवड्यात दमदार पाऊस झाल्याने भाताच्या बियांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यात प्रामुख्याने इंद्रायणी बियांची ९० टक्के पेरणी केल्याचे भुतोंडे येथील शेतकरी भगवान कंक यांनी सांगितले.नीरा देवघर भागात वळवाचा एकही पाऊस झाला नाही. त्यामुळे भाताच्या धूळवाफेवरील पेरण्या रखडल्या होत्या. मात्र एक जूनला झालेल्या पावसामुळे हिर्डोशी परिसरात काही ठिकाणी शेतकरी पेरणी करण्यात आली आहे. तर याच भागातील काही ठिकाणच्या पेरणीची तयारी शेतकरी करीत आहेत. वीसगाव व आंबवडे खोऱ्यात खाचरांची नांगरणी, कुळवणी ही पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात दमदार पाऊस झाल्यावर भाताच्या पेरण्या जोरात सुरु होतील, असा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत.भोर तालुक्यात खरिपाची १५५ गावे असून पिकाखालील क्षेत्र २० हजार हेक्टर आहे. खरीप हंगामात बाजरी, ज्वारी, तूर, उडीद भुईमूग, सोयाबीन, वरई, नाचणी ही पिके घेत असली तरी भात हे प्रमुख पीक असून सुमारे ७५०० हेक्टरवर भाताची लागवड केली जाते. त्यामुळे भाताचे बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी दुकानात एकच गर्दी करीत आहेत. यात प्रामुख्याने इंद्रायणी, रत्नागिरी बासमती, सोनम, कोळंबा तामसाळ इंडम, पार्वती, कर्जत १८४ आंबेमोहोर या जातींच्या बियाणांचा समावेश असून तालुक्यात खाण्यास चविष्ठ आणि सुवासिक वास यामुळे इंद्रायणीच्या बियाला सर्वाधिक मागणी आहे. >फलक लावावाऔषधे, खते व बी-बियाणांच्या दुकानासमोरील भागात बियाणे व खतांची किंमत दर्शवणारा फलक लावावा; अन्यथा दुकानदारांचे परवाने रद्द करू, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने संबंधित दुकानदारांना दिल्या होत्या. मात्र कोणत्याच दुकानासमोर खते, बियाणे व औषधांची किंमत दाखवणारे फलक लावलेले नाहीत. त्यांच्यावर कधी कारवाई होणार?