मुंबई : बँक ऑफ महाराष्ट्रकडून व्यवस्थापकीय संचालक व सीईओ आर.पी. मराठे आणि कार्यकारी संचालक आर.के. गुप्ता यांना पुन्हा अधिकार बहाल केले आहेत. बँकेच्या संचालक मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.
डीएसके प्रकरणात पोलिसांच्या कारवाईनंतर बँकेच्या संचालक मंडळाने २९ जून २०१८ च्या बैठकीत या दोघांचे दैनंदिन कामकाजाशी संबंधित अधिकार काढून घेतले होते. हे अधिकार त्यांना तात्काळ प्रभावाने बहाल करण्याचा निर्णय संचालक मंडळाने मुंबई शेअर बाजार व राष्ट्रीय शेअर बाजाराला कळवला आहे. त्यानुसार मराठे व गुप्ता हे दोघेही शनिवार, २ नोव्हेंबरपासूनच कामकाज सांभाळू शकतात, असे बँकेतील सूत्रांचे म्हणणे आहे.