शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

आंदोलनामुळे दूधपुरवठा घटला

By admin | Published: June 06, 2017 1:24 AM

शहरासह राज्यभरात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे शहरातील दूधपुरवठ्यावर सोमवारी परिणाम झाला

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शहरासह राज्यभरात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे शहरातील दूधपुरवठ्यावर सोमवारी परिणाम झाला; मात्र शनिवारनंतर झालेल्या पुरवठ्यामुळे दूध उपलब्धतेवर मोठा परिणाम झाला नाही. अशीच स्थिती राहिल्यास पुढील दोन दिवस दूधटंचाईची शक्यता नाकारता येत नसल्याचे दूधविक्रेत्यांनी सांगितले. शहरात दररोज १५ लाख लिटर दुधाची आवक होते. त्यातील ३५ टक्के दुधाचे वितरण गवळ्यांमार्फत होते, तर विविध कंपन्यांच्या पिशवीबंद दुधामार्फत उर्वरित दुधाची गरज भागविली जाते. या आंदोलनाचा मोठा फटका पिशवीबंद दुधाच्या पुरवठ्यावर झाला आहे. आंदोलकांनी १ जूनपासून पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज) तीन टँकरमधील दूध रस्त्यावर सोडून दिले. सोमवारी संपामुळे कात्रजमध्ये केवळ ८० हजार लिटर दुधाचे संकलन होऊ शकले. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक क्षीरसागर म्हणाले की, ओतूर आणि वरवंड येथील दोन शीतकरणाचे प्रकल्प बंद होते. २.२५ लाख लिटर दुधाचे संकलन होत असते. त्यात सोमवारी ८० हजार लिटरपर्यंत घट झाली. मंगळवारी एक लाख लिटरपर्यंत दूध उपलब्ध होईल. श्रीकृष्ण चितळे म्हणाले की, सोमवारी दूध वितरण सुरळीत राहिले. मंगळवारीदेखील पुरेसे दूध उपलब्ध होईल. गणेश पेठ दूधभट्टी येथे दुधाची ३ हजार लिटर इतकी आवक झाली. मागणीमुळे दुधाला प्रतिलिटर ७४ ते ७५ रुपये इतका दर मिळाल्याचे व्यापारी दामोदर हिंगमिरे यांनी सांगितले.