मुंबई - गँगमनने दाखवलेल्या सतर्कतेमुळे मुंबई पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसला होणारा मोठा सुदैवाने टळला. आज सकाळी खंडाळा घाटातील ठाकूरवाडी ते मंकी हिलदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेले होते. त्याच दरम्यान, मुंबईहून सुटणारी मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस त्या परिसरात पोहोचली. मात्र पेट्रोलिंग करून घरी परतत असलेले गँगमन सुनील कुमार यांनी रुळांना गेलेले हे तडे पाहिले. त्यांनी प्रसंगावधान दाखवत इंटरसिटी एक्सप्रेसच्या ड्रायव्हरला इशारा केला. त्यानेही त्याला प्रतिसाद देऊन वेळीच ट्रेन थांबवली. त्यामुळे मोठा अपघात टळला.
त्यानंतर थोड्याच वेळात रेल्वेच्या इंजिनिरिंग स्टाफने येऊन पाहणी केली आणि ट्रॅक तात्पुरती रिपेअर करून इंटरसिटी पुण्याकडे रवाना केली, अशी माहिती रेल्वे प्रवासी संघटनेचे नितीन परमार यांनी दिली.