ऑनलाइन लोकमत/हनुमंत देवकरचाकण, दि. 25 - लोकमत टीम, पोलीस व नागरिकांच्या सतर्कतेमुळे चाकण येथील कोहिनूर सेंटर मधील ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सच्या चाकण शाखेला शॉक सर्किटने होणारी मोठी दुर्घटना टळली.याबाबतची हकीकत अशी कि, आज रविवारी दुपारी साडेबारा ते पावणे एकच्या सुमारास वाजत होता. रविवारची सुट्टी असल्याने सगळीकडे शुकशुकाट होता. सायरन वाजत राहिल्याने काही क्षणात लोक जमा झाले. शॉक सर्किटमुळे आतमध्ये आग लागल्याची शक्यता लोकांनी वर्तवली. यावेळी पहिल्या मजल्यावर लोकमतच्या चाकण कार्यालयात वर्धापन दिनानिमित्त कर्मचारी उपस्थित होते. चाकण कार्यालयातील प्रतिनिधी विनोद मांजरे व तळमजल्यावरील मॉन्जिनीज केक शॉपचे संचालक दिनेश साळवी यांनी ही घटना त्वरित चाकण वार्ताहर हनुमंत देवकर यांनी कळविली. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरित पोलीस ठाण्यात फोन करून पोलिसांना पाचारण केले. दोन पोलीस ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. बँकेचे लिपिक गणपत तारू यांना माहिती मिळताच त्यांनी वरिष्ठांना कळविले. बँकेच्या राजगुरूनगर शाखेचे व्यवस्थापक श्रीकांत तावडे, गणपत तारू, रखवालदार प्रदीप गिरासे, सिक्युरिटी इन्चार्ज कॅप्टन पांडे व पोलीस हवालदार प्रमोद भोसले, पोलीस नाईक देवाडे यांच्या उपस्थितीत बँकेचे कुलूप तोडण्यात आले. इलेक्ट्रिशियन सागर कदम यांनी त्वरित सर्व वीज यंत्रणा बंद केली, अन मोठी दुर्घटना टळली.
पोलीस व नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळली दुर्घटना
By admin | Published: December 25, 2016 4:07 PM