शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
3
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
4
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
5
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
6
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
7
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
8
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
10
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
11
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
12
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
13
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
14
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
16
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
17
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
18
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
19
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
20
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

महिलेच्या सतर्कतेमुळे ‘घरफोडया’ जेरबंद, आईमुळे वाचले मुलाचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2017 9:29 PM

डोंबिवली शहरात घरफोडीच्या घटनांनी उच्छाद मांडला असताना दुसरीकडे अंजली घाडीगांवकर (वय 39) या महिलेच्या सतर्कतेमुळे दिवसाढवळया घरफोडी करणारा चोरटा जेरबंद झाला.

डोंबिवली -  शहरात घरफोडीच्या घटनांनी उच्छाद मांडला असताना दुसरीकडे अंजली घाडीगांवकर (वय 39) या महिलेच्या सतर्कतेमुळे दिवसाढवळया घरफोडी करणारा चोरटा जेरबंद झाला. विशेष बाब म्हणजे घरात घुसलेल्या चोरटयाकडून अंजली यांचा मुलगा प्रणव (वय 14) याला जीवे मारण्याचा प्रयत्नही झाला परंतुु त्याचवेळी कामावरून घरी परतलेल्या अंजली यांनी आरडाओरडा केल्याने प्रणव याचे प्राण वाचले आणि आजुबाजुला राहणा-या रहिवाशांनी  पळणा-या चोरटयाला बेदम चोप देत रामनगर पोलिसांच्या हवाली केले. अंजली या मुंबई बांद्रा येथे कामाला आहेत त्यांचे पती आशिष देखील कामानिमित्त मुंबईला जातात. डोंबिवली पुर्वेकडील राजाजी पथ, म्हात्रे नगरमधील विनीत सदनमध्ये राहणारे घाडीगांवकर पती-पत्नी दोघेही नेहमीप्रमाणो मंगळवारी कामाला मुंबईला गेले होते. तर पाटकर शाळेत इयत्ता आठवीत शिकणा-या प्रणवची बुधवारपासून सहामाही परिक्षा असल्याने मंगळवारी त्याला सुट्टी होती. त्यामुळे तो आणि त्याची आजी सरस्वती असे दोघेच घरात होते. परंतु, सरस्वती या डॉक्टरकडे गेल्याने प्रणव दुपारच्या सुमारास घरी एकटाच होता. दुपारी प्रणव हा घराला लॉक लावून आईस्क्रिम खाण्यासाठी गेला होता. दरम्यान त्याच कालावधीत चोरटयाने घराचे कुलुप तोडुन घरात प्रवेश केला. घरातील कपाट फोडुन त्यातील ऐवज चोरण्याचा चोरटयाचा खटाटोप चालू असतानाच प्रणव हा घरी परतला असता त्याच्या हा प्रकार निदर्शनास पडला. प्रणवने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता चोरटयाने त्याचा गळा आवळीत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतू परिक्षा असल्याने प्रणवचा अभ्यास घेण्यासाठी कामावरून लवकर घरी परतणा-या अंजली त्याचवेळेस सुदैवाने घरी आल्या आणि समोरचा प्रकार पाहून त्यांना एक च धकका बसला, त्यांनी हा सर्व प्रकार पाहताच जोरदार आरडाओरड करायला सुरूवात केली. या आवाजाने मदतीसाठी घराकडे धाव घेतलेल्या रहिवाशांनी आणि नागरीकांनी पळणा-या चोराला पकडले आणि बेदम चोप देत रामनगर पोलिसांच्या हवाली केले. रेहान फुरखान खान (वय 36 ) असे या चोरटयाचे नाव असून तो उत्तरप्रदेश मधील मेरठ, बाजारघर येथील राहणारा आहे. पोलिसांना घटनास्थळी लोखंडी कटावणी आढळुन आली असून चोरटा घरातील 3क् हजार रूपयांचे सोन्याचे दागिने आणि 8 हजार 5क्क् रूपयांची रोकड असा 38 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल चोरून पोबारा करत होता. परंतू अंजली यांच्या सतर्कतेमुळे त्याचा प्रयत्न सफल होऊ शकला नाही. या घरफोडीच्या घटनेची रामनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. चोरटा रेहान याला बुधवारी कल्याण जिल्हासत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 6 ऑक्टोबर्पयत  दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाthaneठाणे