शिर्डी : शनिदेव हा मनुष्यजातीच्या मागे साडेसाती लावतो, असे म्हटले जाते. मात्र, आता या शनिच्याच मागे वादाची ‘साडेसाती’ सुरू झाली आहे़ शनिदेवाच्या सदोष मंदिर रचनेमुळेच ही साडेसाती सुरू झाल्याचा दावा, वास्तुशास्त्रज्ञ कुलदीप सलुजा यांनी केला आहे़शनिशिंगणापूर देवस्थानला सलुजा यांनी भेट देऊन तेथील वास्तुदोष विश्वस्तांच्या निदर्शनास आणून दिले़ उज्जैन येथील उद्योजक असलेल्या व देशभरातील प्रमुख मंदिरांच्या वास्तूचे अभ्यासक असलेल्या सलुजा यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या नवीन वास्तुंच्या निर्मितीने वास्तुदोष निर्माण झाले आहेत़ अलीकडे देवस्थानने मूर्तीवर तेल चढवण्यासाठी शनिमूर्तीच्या नैऋत्य कोनात तयार केलेली टाकी, आग्नेय दिशेचे नवीन प्रवेशद्वार, उत्तर दिशेला बनविलेले नवीन शेड त्यामुळे तुटलेला ईशान्य कोन, या सर्व प्रकारांमुळे देवस्थानात चोरी, कलह वाढले़ भाविकांची संख्या, प्रसिद्धी व उत्पन्न कमी झाल्याचा दावा सलुजा यांनी केला.(प्रतिनिधी) साईबाबांची समाधी, समाधी मागे असलेली भूमिगत विहीर, द्वारकामाई, दक्षिण बाजूला असलेल्या इमारती, दर्शनबारीतील खोलगट भाग आदी वास्तुनुकूलतेमुळे शिर्डी विश्वविख्यात आहे़ मात्र, मंदिराच्या मुख्य हॉलच्या पुढे आलेल्या पूर्व आग्नेय भागाच्या दोषामुळे विश्वस्तांमध्ये वाद संभवतात़ चौथऱ्याबाबत आज बैठकअहमदनगर : शनी चौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्याच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होत असून, बैठकीला लोकप्रतिनिधी, देवस्थानचे विश्वस्त, भूमाता ब्रिगेड आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या हजर राहणार आहेत़
वास्तुदोषामुळे वादाची साडेसाती
By admin | Published: February 06, 2016 3:41 AM