ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - नाशिक आणि नगर जिल्ह्यातील पाणी जायकवाडी धरणात सोडण्याच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. हायकोर्टाच्या स्थगितीमुळे नाशिक व नगर जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळणार असला मराठवाड्यातील पाणीप्रश्न चिघळण्याची चिन्हे आहेत.
नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधील पाणी मराठवाड्यातील जायकवाडी धरणात सोडण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. या निर्णयाला नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील जनतेने विरोध दर्शवला होता. गेल्या दोन दिवसांपासून सर्वपक्षीय नेत्यांचे याविरोधात आंदोलन सुरु होते. नाशिक व नगरमधील साखर कारखानदारांनी या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मंगळवारी याचिकेवरील सुनावणीदरम्यान हायकोर्टाने पाणी सोडण्यास २६ ऑक्टोबरपर्यंत तात्पुरती स्थगिती दिली. याप्रकरणाची पुढील सुनावणी २३ ऑक्टोबरला होणार आहे.