मनोर : महसुल खात्याने जमीन कागदपत्र संगणकी करण्यासाठी गेल्या आठ महिन्यापसून सातबारा फेरफार करण्याची कामे बंद केले असून पावसाळयात शेती साठी कागदपत्रा विना शेतकऱ्यांची सोसायटी व बँक कडुन कर्ज घेण्यासाठी मोठी कुचुंबना होत आहे. त्यामुळे यंदा शेती कारायची कशी असा प्रश्न पडला आहे.पालघर जिल्हयातील ग्रामीण भागातील मोठया प्रमाणात भात शेती केली जाते त्यासाठी भात बियाणे शेती कामासाठी लागणाऱ्या मजुरांची मजुरी आणि पैसा लागातो. त्यासाठी आदिवासी, कुणबी समाज सोसायटी व बँकेतुन कर्ज घेतो परंतु परंतु शेतजमीनीवर कर्ज घेण्यासाठी सातबारा फेरफार व इतर पेपर्स त्या बँकेत जमा करावे लागतात नंतर शेतकऱ्याला कर्ज मिळते. परंतु गेल्या सात ते आठ महिन्यापासून पुर्ण जिल्हयाचा महसूली कागदपत्रांचा दफतर संगणकी करण करण्यासाठी काम सुरू असल्यामुळे तलठी कार्यालयात एकच उत्तर मिळते. (वार्ताहर) आॅनलाईन झाल्याशिवाय फेरफार करता येणार नाही त्यामुळे सध्या शेतीच्या कामाला सुरवात कर्जा विनाच करण्यासाठी शेतकऱ्यांची पंचायत होईल अशी दाट शक्यता दिसत आहे. पुर्ण पालघर जिल्हयात सध्या तलाठी कार्यालयात कामे ठप्प आहेत.
सातबारे देणे बंद झाल्याने यंदा पीक कर्ज अवघड
By admin | Published: June 08, 2016 2:50 AM