पनवेल : पनवेल शहरामध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यूची साथ पसरत आहे. प्रभू आळी, मुसलमान नाका, परदेशी आळीमध्ये संशयित रुग्ण आढळले असल्याने पालिकेने विविध मोहीम हाती घेऊन शहरात धुरीकरण औषध फवारणी सुरू केली आहे. डेंग्यूची लागण झालेल्या सुरेखा सावंत (४२) या महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे, यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. डेंग्यूच्या साथीमुळे अनेकांची दिवाळी रु ग्णालयातच गेली असल्याचे दिसून येत असताना ३० आॅक्टोबर रोजी एका महिलेच्या दुर्दैवी मृत्यूमुळे शहरामध्ये भीतीचे वातावरण आहे. पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी देखील यासंदर्भात अधिकाऱ्यांना सक्त ताकीद देऊन फवारणीला व औषधीकरणाला गती दिली आहे. यासंदर्भात नागरिकांनी देखील सतर्कराहण्याची गरज असल्याचे आरोग्य अधिकारी दिलीप कदम यांनी सांगितले. शहरात विविध पथके गठीत करून रोज अनेक ठिकाणी फवारणी व धुरीकरण होत असल्याचे सांगितले. आतापर्यंत ६५ हजार घरांना भेटी देऊन जनजागृती केली असल्याचे सांगितले. भंगारवाले तसेच फेरीवाले यांना नोटीस पाठवून पाणी साचणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले असल्याचे कदम म्हणाले. (प्रतिनिधी)
डेंग्यू नियंत्रणासाठी पालिकेने कसली कंबर
By admin | Published: November 03, 2016 2:33 AM