शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

कोरोनामुळे यंदाही शाळेतील प्रवेशोत्सवाला विद्यार्थी, शिक्षक मुकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 6:51 AM

शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून ऑनलाइन पद्धतीनेच सुरू होणार   

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शाळेचा पहिला दिवस... उन्हाळी सुटीनंतर मित्र-मैत्रिणींची भेट होणार... पुन्हा शाळेची घंटा ऐकू येणार... रांगेत उभे राहून राष्ट्रगीताने शाळेची सुरूवात होणार... हे चित्र यंदाही लवकर दिसण्याची शक्यता कमी आहे. अजून दोन ते तीन महिने प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून ऑनलाईन पद्धतीनेच सुरू होणार आहे. दरवर्षी शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा केला जातो; पण विद्यार्थ्यांच्या स्वागताला शिक्षक सलग दुसऱ्या वर्षीही मुकणार आहेत.कोरोनाचा राज्यातील प्रादुर्भाव कमी होत असला तरी विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेत यंदाचे शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीनेच सुरू करणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली आहे. शाळांची प्रत्यक्षातील घंटा वाजण्यास आणखी २ ते ३ महिने लागू शकतात, असेही त्यांनी सांगितले. 

शैक्षणिक साहित्याची खरेदी थंड्या बस्त्यातनवीन शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने सुरू होणार असल्याने बाजारातील शैक्षणिक साहित्य खरेदीचे वातावरण थंडावलेले दिसत आहे. पालकांना आपल्या पाल्यासाठी यंदा वह्या-पुस्तके, दप्तरे, पाण्याच्या बाटल्या, गणवेश आदी शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी घाई करावी लागणार नाही. परिणामी बाजारात शैक्षणिक साहित्य खरेदीचा उत्साहही फारसा दिसणार नाही. 

विशेष ब्रिज कोर्स शाळा सुरू झाल्यानंतर ऑनलाइन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना उजळणीसाठी विशेष ब्रिज कोर्स निश्चित केला असून, ब्रीज कोर्सच्या माध्यमातून ही उजळणी १ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. हा ब्रीज कोर्स दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असणार आहे. मात्र, यासंदर्भातील सूचना शाळांना न दिल्याने यामुळेही शाळांचे नियोजन कोलमडणार असल्याची प्रतिक्रिया के. व्ही. के. घाटकोपर सार्वजनिक स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जगदीश इंदलकर यांनी दिली.

तासिकांबाबत मार्गदर्शन आवश्यकnअनेक शाळा ऑनलाइन तासिका घेत असल्याने त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर होत आहे. nत्यामुळे एखादा विषय किती वेळ शिकवावा, यासाठी त्या विषयाला किती तासिका द्याव्यात, त्याची चाचणी, स्वाध्याय, गृहपाठ यांचे नियोजन कसे करायचे, याच्या मार्गदर्शक सूचना शाळांना शिक्षण विभागाने देणे अपेक्षित आहे. nमात्र, अद्याप त्या न आल्याने ऑनलाइन वर्ग घेताना राज्यातील विविध शाळांत गोंधळ होण्याची शक्यता मुख्याध्यापक संघटनेचे मुंबई सचिव पांडुरंग केंगार यांनी दिली. 

टॅग्स :Schoolशाळा