शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
3
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
4
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
5
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
6
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
7
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
9
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
10
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
11
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
12
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
13
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
14
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
15
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
16
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
17
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
18
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
19
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...

Coronavirus: कोरोनाने अडवली आंब्याची परदेशातील वाट; निर्यातीत ४० टक्क्यांची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 5:46 AM

आंतरराष्ट्रीय विमानांवरील निर्बंधांचा परिणाम

सुहास शेलारमुंबई : कोरोनाने आंब्याची परदेशात जाण्याची वाट अडवली आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंधांमुळे विमान उड्डाणांची संख्या कमी झाल्याने त्याचा परिणाम आंब्याच्या निर्यातीवर झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याच्या निर्यातीत जवळपास ४० टक्क्यांची घट नोंदविण्यात आल्याची माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी दिली.

महाराष्ट्रातून हवाई आणि जलमार्गे आंब्याची निर्यात होते. त्यातही जलद वाहतुकीसाठी हवाई मार्गाचा प्रामुख्याने अवलंब केला जातो. एअर कार्गो सुविधेचे दर चढे असल्याने प्रवासी विमानांद्वारे आंबा निर्यात करण्यावर व्यापारी भर देतात. प्रवासी विमाने पार्सलसाठी राखीव असलेल्या जागेतून आंब्याचे वहन करतात. भारतात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर विमान प्रवासावर निर्बंध लागू करण्यात आल्याने आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या जवळपास ९० टक्क्यांनी घटली आहे. परिणामी विमानफेऱ्यांच्या संख्येवरही परिणाम झाल्याने आंब्याच्या निर्यातीत अडथळे येत आहेत.

गेल्या वर्षी प्रवासी विमानांच्या साहाय्याने ४९,६५९ मेट्रिक टन आंबा निर्यात करण्यात आला. त्यातून जवळपास ४ हजार कोटी रुपये उत्पन्न मिळाले. परंतु, यंदा विमान प्रवासावरील निर्बंधांमुळे आतापर्यंत केवळ ३० हजार मेट्रिक टन आंबा निर्यात करता आला. त्यामुळे उत्पन्न २ हजार ३०० काेटी रुपयांवर स्थिरावल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

वेळेत अंमलबजावणी झालीच नाहीजलवाहतुकीद्वारे आंब्याची निर्यात वाढविण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण करा, सुविधा वाढवा, अशा सूचना सरकारला केल्या होत्या. त्याची वेळीच अंमलबजावणी झाली असती तर हवाई वाहतुकीवरील अवलंबित्व संपले असते आणि सध्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे होत असलेले नुकसान टाळता आले असते. - चंद्रकांत मोकल, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघतूट भरून काढणे अवघडआंब्याच्या निर्यातीसाठी प्रवासी विमानांवर अवलंबून राहावे लागते, कारण एअर कार्गो सुविधेचे दर हे तिप्पट आहेत. यंदा प्रवासी विमानांच्या फेऱ्या कमी झाल्याने त्याचा सर्वाधिक फटका आंब्याच्या निर्यातीला बसला. निर्यातक्षम आंब्याचा हंगाम ओसरत आल्याने ही तूट भरून काढणे अवघड आहे. - रत्नाकर कराळे, आंबा निर्यातदार

टॅग्स :Mangoआंबाcorona virusकोरोना वायरस बातम्या