शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
2
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
3
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
4
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
5
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
6
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
7
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
8
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
9
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
10
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
11
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
12
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
13
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
14
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
15
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
16
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
17
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
18
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
19
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
20
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?

डेंग्यूच्या अळ्या सापडल्याने १९ जणांवर गुन्हे दाखल

By admin | Published: September 21, 2016 3:05 AM

शहरात डेंग्यू व मलेरियाची साथ मोठ्या प्रमाणात पसरू लागली आहे.

नवी मुंबई : शहरात डेंग्यू व मलेरियाची साथ मोठ्या प्रमाणात पसरू लागली आहे. नागरिकांनी घरात व परिसरात पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. परंतु यानंतरही निष्काळजीपणा करणाऱ्या १९ नागरिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. नवी मुंबईमध्ये तापाची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे. करावेमध्ये डेंग्यूचे रूग्ण मोठ्या प्रमाणात सापडू लागले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होवू लागला आहे. महापालिकेचे कर्मचारी योग्यप्रकारे काम करत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. महापालिकेने मात्र नागरिकच योग्य खबरदारी घेत नसल्याचा दावा केला आहे. वैद्यकीय अधिकारी कविता बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या पथकाने करावे परिसरात डेंग्यू व मलेरियाच्या अळ्या शोधण्याची मोहीम सुरू केली होती. यामध्ये साई वाडी झोपडपट्टीमध्ये अनेक नागरिकांच्या घरामध्ये अळ्या सापडल्या. या परिसरात महापालिकेने यापूर्वीही जनजागृती केली होती. पोस्टर्स लावून पाणी साचून देवू नये असे आवाहन केले होते. परंतु यानंतरही नागरिकांनी काळजी घेतली नसल्याने हा प्रकार घडला आहे. साई वाडीतील नागरिकांच्या घरात पाण्याचे ड्रम, भंगार साहित्य व इतर ठिकाणी साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या सापडल्या. या प्रकारास येथील रहिवासीच जबाबदार असल्याचा ठपका ठेवून महापालिकेचे कर्मचारी बाळकृष्ण ज्ञानदेव वर्ये यांनी एनआरआय पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. डेंग्यू व मलेरियाच्या डासांच्या उत्पत्तीस जबाबदार धरून १९ जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्याप्रमाणात गुन्हे दाखल झाल्याची ही पहिलीच घटना असल्याने शहरात खळबळ उडाली आहे. डेंग्यूची साथ पसरल्यास उपाययोजना होण्याऐवजी गुन्हेच दाखल होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. >गुन्हे दाखल केलेल्यांची नावे अलोक सिंग, काळू सिंग, शकिल शेख, रामचंद्र शर्मा, शेखर नाईक, अखिलेश यादव, अजित साळुंखे, बिराज सोनार, सुनील सोनावणे, राजू बाबू, दीपक माने, शिवाजी वायदंडे, प्रमिला मेवाला, बालकदास, रंजना अहिरे, जे. के. नाईक, बाबू पटेल, नारायण गुजर यांचा समावेश आहे.