शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
मेल्यावरही फरफट, झोळीतून नेला देह, रस्ताच नसल्याने चार किमी पायपीट, पेणमधील विदारक चित्र
3
"जागतिक महासत्तांच्या यादीत भारत हवा", व्लादिमीर पुतिन यांचं विधान
4
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
5
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
6
"काँग्रेसकडून जाती-जातीत भांडण लावण्याचा खतरनाक खेळ, म्हणूनच 'एक है तो सेफ है"', नरेंद्र मोदी यांचा घणाघात
7
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
8
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
9
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
10
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
11
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
12
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
13
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
14
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
16
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
17
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
18
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
20
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान

दुष्काळाच्या झळा, पोटाची खळगी भरण्यासाठी सोडले गाव

By admin | Published: January 06, 2015 12:05 AM

बुलडाणा जिल्ह्य़ातून शेतकरी, शेतमजुरांचे स्थलांतर.

गजानन सरकटे/देऊळगाव कुंडपाळ (जि. बुलडाणा) : बुलडाणा जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा प्रमाणात बसत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी लोणार तालुक्यातून अल्पभूधारक शेतकरी व शेतमजूर मोठय़ा शहरांसह कर्नाटक राज्यात मजुरीसाठी स्थलांतरीत होत आहे. पावसाच्या हुलकावणीमुळे शेतकर्‍यांना खरीप व रब्बी हंगामात फटका बसला; सर्वत्र दुष्काळाच्या झळा जाणवत असल्याने शेतमजुरांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी व संसाराचा गाडा पुढे ढकलण्यासाठी लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथील ३0 अल्पभुधारक शेतकरी आपल्या कुटुंबियांसह कामाच्या शोधात कर्नाटकला रवाना झाले आहेत. यावर्षी शेतकर्‍यांचे नियोजन कोलमडले आहे. सद्यस्थितीत शेतकरी व शेतमजुरांसमोर रोजगारासोबतच बँकाचे पीक कर्ज, सावकारी कर्ज, कुटूंबाचा उदरनिर्वाह असे अनेक प्रश्न उभे आहेत. देऊळगाव कुंडपाळ येथील हरिभाऊ राठोड, अशोक सरकटे, ज्ञानेश्‍वर तुळशिराम सरकटे, प्रकाश गावडे, महादेव खुमणे, रामचंद्र राठोड, विनोद राठोड, लक्ष्मण राठोड, दिनकर अंभोरे, विजय राठोड, शिवाजी नाईक, चव्हाण, मुंदळकर, पिटकर, पंडितराव सरकटे, रमेश सरकटे, नारायण सरकटे, सुधाकर सरकटे, संजय सरकटे यांच्यासह गावातील अल्पभुधारक शेतकरी व शेतमजुर रोजगाराच्या शोधात कर्नाटकमधील किरणवाडी येथे स्थलांतरीत झाले आहेत. रोजगारासाठी परिसरातील अनेक शेतमजूर शहराकडे स्थलांतरीत होण्याचे प्रमाण वाढत असून प्रशासनाने याकडे लक्ष देऊन मजुरांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. *शेकडो मजुरांचे स्थलांतरलोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळसह टिटवी, नांद्रा, गोत्रा, रायगाव, गंधारी, मढी, सावरगाव मुंढे, धाड, किन्ही या आदीवासी बहुल गावातून हजारो अल्पभुधारक शेतकरी व शेतमजूर मुंबई, नाशिक, सुरत, पुणे, कर्नाटक राज्यात काम शोधण्यासाठी स्थलांतरीत झाले. स्थलांतरीत मजुरांची संख्य जवळपास एक हजार दोनशे एवढी आहे. *रोहयोची कामे कागदावरच बुलडाणा जिल्हाभर रोजगार हमीची कामे मंजूर आहेत. परंतु, रोहयोच्या कामासाठी मजूर केवळ कागदावर दाखवून त्यांची मजुरी अधिकार्‍यांच्या खिशात गडप होत असल्याचे वास्तव आहे. परिणामी कोट्यवधीची कामे मंजूर असतानाही मजुरांच्या हाताला काम दिले जात नसल्याने मजुरांचे स्थलांतर होत आहे. रोजगार हमी योजनेच्या कमाबाबत जनजागृती नसल्याने या कामांकडे मजुरांचेही लक्ष नाही.