नाना देवळे, ऑनलाइन लोकमत
मंगरुळपीर, दि. १० - तालुक्यातील मोहगव्हाण येथील शेत शिवारातील रोहित्र दीड महिन्यांपूर्वी बंद पडले. त्यातच पावसाने महिनाभरापासून दडी मारल्यामुळे खरीपातील सोयाबीन, तूर, कपाशी ही पिके सुकत आहेत. अशात पाण्याची सोय असतानाही शेतकरी पिके वाचविण्यात असमर्थ ठरत आहेत. त्यासाठी विज वितरणकडे वारंवार तक्रार करूनही त्यांनी कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे मोहगव्हाण येथील शेतकरी केशवराव भगत यांनी इच्छा मरणाची परवानगीच निवेदनाद्वारे मागितली आहे.
मागील तीन वर्षांतील अवर्षणानंतर यंदा प्रथमच पावसाने सुरुवातीचे दोन महिने चांगली साथ दिली. त्यामुळे शेतकºयांना उडीद, मूग या पिकांचे बºयापैकी उत्पादन झाले. तथापि, तालुक्यात यंदाही सोयाबीन आणि तूर या पिकांचाच पेरा अधिक आहे. सुरुवातीला चांगली साथ देणाºया पावसाने महिनाभरापासून दडी मारल्यामुळे ही पिके सुकत आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच आलेल्या जोरदार पावसामुळे पाणी पातळी वाढली, जलाशये भरली. त्यामुळे शेतकºयांना सिंचनाचा आधार घेऊन ही पिके वाचविणे शक्य होऊ शकते; परंतु शेतकºयांच्या या प्रयत्नानांही विज वितरणची हलगर्जी खोडा घालत आहे. मंगरुळपीर तालुक्यात अनेक ठिकाणी आवश्यक वेळी विज पुरवठा होत नाहीच शिवाय कृषी फिडरची काही ठिकाणची रोहित्र जळून बंद पडल्याने शेतकरी सुकत चाललेल्या पिकांकडे डोळाभर पाहून आसू गाळण्याखेरीज काहीच करू शकत नाहीत. अशीच परिस्थिती मंगरुळपीर तालुक्यातील मोहगव्हाण येथे पाहायला मिळत आहे. या ठिकाणचे रोहित्र दीड महिन्यापूर्वी बंद पडल्याने शेतकरी पिकांना पाणी देण्यात असमर्थ ठरत आहेत. विज वितरणकडे वारंवार मागणी करूनही सदर रोहीत्र बदलण्याची तसदी घेण्यात येत नाही. त्यामुळे येथील प्रगतशील शेतकरी केशवराव भगत यांनी प्रशासनाकडे निवेदन सादर करून इच्छा मरणाची परवानगीच मागितली आहे. या निवेदनावर राजू इंगोले, पंडित इंगोले, सिद्धार्थ इंगोले, शंकर धनकर आदि शेतकºयांच्याही स्वाक्षºया आहेत.