रत्नागिरी : भाजपाने शिवसेनेबरोबर 25 वर्षे युती जपली. अनेक अडचणी आल्या तरी भाजपाने सामंजस्याची भूमिका घेतली. भांडणो टाळली; मात्र यावेळी 151 पेक्षा एकही जागा कमी करणार नाही यावर शिवसेना अडून बसली. मुख्यमंत्री सेनेचाच होणार अशी घोषणा करून ज्याचे आमदार अधिक निवडून येतील, त्यांचा मुख्यमंत्री या ठरलेल्या संकेताला हरताळ फासला. शिवसेनेच्या या अतिरेकी भूमिकेमुळेच युती तोडावी लागली , असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केला.
रत्नागिरीत प्रमोद महाजन क्रीडा संकुलात आयोजित प्रचारसभेत गडकरी बोलत होते. गडकरी म्हणाले, राज्याचा विकास काही झाला नाही; मात्र कॉँग्रेस नेते, त्यांचे नातेवाईक, कार्यकत्र्याचाच विकास झाल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यातही घराणोशाहीला ऊत आला आहे. मोदी यांनी सत्तेत येताच खासदाराचा मुलगा खासदार होणार नाही, अशी घोषणा करून घराणोशाहीलाच विरोध दर्शविल्याचे गडकरी यांनी सांगितल़े
रात्रीत पक्षाचे कपडे बदलले?
रत्नागिरी मतदारसंघातील पक्षबदलूपणाच्या वृत्तीवर गडकरी यांनी कडाडून टीका केली. राष्ट्रवादीने सर्वकाही देऊनही एका रात्रीत पक्षाचे कपडे बदलणा:या पक्षबदलूंना जनता निवडून देणार काय, असे कार्यकत्र्यानी जनतेला विचारावे, असेही गडकरी म्हणाले. (प्रतिनिधी)
राणोंना चिंता मुलांच्या रोजगाराची
परिवार वादाच्या नावाखाली काँग्रेस नेते मुलांना राजकीय रोजगार उभा करू पाहत आहेत. त्यामुळे राजन तेलींसारख्यांना संधी कोठे मिळणार? असा प्रश्न करीत काँग्रेस नेते नारायण राणो यांना दोन मुलांच्या रोजगाराची चिंता पडली असल्याची खरमरीत टीका केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी सावंतवाडीत केली़