शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
2
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
3
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
4
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
5
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; कुणाकुणाला संधी? पाहा...
6
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
7
"लाव रे तो व्हिडिओ..."  विषय 'गंभीर', दोन दिवस खेळायला कुणीच नाही 'खंबीर'
8
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
9
एकेकाळी राणेंना आव्हान देणारा शिवसैनिक ठाकरे गटात, परशुराम उपरकर यांनी हाती बांधलं शिवबंधन 
10
भाजपाच्या यादीत किती महिलांना स्थान?; खासदार अशोक चव्हाणांच्या मुलीला मिळाली संधी
11
Somy Ali : "बिश्नोई समाज काळवीटाची पूजा करतो हे सलमानला माहीत नव्हतं, मी त्यांची माफी मागणार"
12
उमेदवार द्यायचे की पाडायचे? मनोज जरांगे पाटील यांनी घेतला मोठा निर्णय, केली महत्त्वाची घोषणा
13
गणपत गायकवाड यांच्या पत्नीला भाजपकडून तिकीट; शिवसेनेचे महेश गायकवाड अपक्ष लढणार?
14
पहिली यादी आली, भाजपाला मोठा धक्का; माजी आमदाराचा पक्षाला रामराम, परिवर्तन महाशक्तीत प्रवेश
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी CM एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार? शिवसेनेचे नेते म्हणाले...
16
अलर्ट! UPI फ्रॉडपासून सावधान; हॅकर्स ओढतात जाळ्यात, एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
17
उद्धव ठाकरेंच्या रणनीतीला शरद पवारांचा ब्रेक?; सांगोला मतदारसंघावरून होणार वाद
18
"पराभवाच्या भीतीमुळेच विरोधकांची मतदार यादीवरून ओरड", भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा टोला 
19
मोठा ट्विस्ट! विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या चिन्हात बदल? आयोगाने घेतला निर्णय
20
महागाईचा चटका! आता CNG सामान्यांचा खिसा खाली करणार, कितीने वाढणार?

प्रोबेस कंपनीतील स्फोट वेल्डिंगमुळे

By admin | Published: July 23, 2016 3:20 AM

प्रोबेस कंपनीत झालेला भीषण स्फोटकंपनीत सुरू असलेल्या वेल्डिंगची ठिणगी रसायनावर उडाल्याने झाला, अशी माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाली

डोंबिवली : स्टार कॉलनीतील प्रोबेस कंपनीत झालेल्या भीषण स्फोटाची चौकशी करण्याकरिता राज्य सरकारने नियुक्त केलेल्या सत्यशोधन समितीचा अहवाल अजून सादर झालेला नसतानाच हा भीषण स्फोट कंपनीत सुरू असलेल्या वेल्डिंगची ठिणगी रसायनावर उडाल्याने झाला, अशी माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या कल्याण कार्यालयाच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. डोंबिवलीतील जागरूक नागरिक राजू नलावडे यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती संचालनालयाच्या कल्याण कार्यालयाकडे विचारली होती. प्रोबेस कंपनीतील डिस्टीलेशन शेडजवळ वेल्डिंगचे काम सुरू होते. त्याच ठिकाणी प्रोपार्जील क्लोराइड या ज्वालाग्राही रसायनाचा साठा ठेवला होता. वेल्डिंगची ठिणगी त्यावर पडली आणि रसायनाने पेट घेतला. त्यामुळे कंपनीत भीषण स्फोट झाला. कंपनीत या अत्यंत ज्वलनशील रसायनाचा दोन ते तीन टन साठा होता. त्यामुळे स्फोटाची तीव्रता अत्यंत भीषण स्वरूपाची होती. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती स्फोटाच्या कारणांचा शोध घेत आहे. समितीने एक महिन्यात राज्य सरकारला अहवाल सादर करणे अपेक्षित होते. समितीने एक महिन्याची वाढीव मुदत मागितली होती. येत्या चार दिवसांनी स्फोटाला दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण होईल. डोंबिवली औद्योगिक क्षेत्रात ४३७ कारखाने आहेत. या कारखान्यांचे सेफ्टी आॅडिट केले असल्यास त्याची सविस्तर माहिती द्यावी, अशी मागणीही नलावडे यांनी संचालनालयाकडे केली होती. मात्र, सेफ्टी आॅडिटची प्रत देता येत नाही, असे संचालनालयाने कळवले आहे. कारखाने अधिनियमानुसार, कारखान्यातील उत्पादन प्रक्रियेविषयी माहिती न देण्याचे बंधन आहे. मात्र, आपण उत्पादन प्रक्रियेविषयी माहिती मागितलेली नसून सेफ्टी आॅडिटविषयी माहिती मागवली आहे. ती न देण्यासाठी चुकीच्या अधिनियमाचा आधार संचालनालयाने घेतल्याचे नलावडे यांचे म्हणणे आहे. कारखान्याचे सेफ्टी आॅडिट संचालनालयाने केले असून त्यात सगळ्या कारखान्यांकरिता ‘समाधानकारक’ हाच शेरा लिहिला असल्याचे समजते. त्यामुळे ही माहिती दिल्यास संचालनालयाचे पितळ उघड होईल, त्यामुळे माहिती देण्याचे टाळले असल्याचे नलावडे यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे प्रोबेस कंपनीला सेफ्टी आॅडिट करण्यास फेब्रुवारी २०१६ मध्ये नोटीस बजावली होती. कंपनीने सेफ्टी आॅडिट केले होते की नाही, याचीच माहिती संचालनालयाच्या अधिकारीवर्गाकडे उपलब्ध नसल्याची बाब स्फोटानंतर समोर आली होती. (प्रतिनिधी)>नंबर देण्यास टाळाटाळ डोंबिवलीतील कारखान्यांत काही अपघात घडल्यास व काही तक्रार असल्यास अधिकाऱ्यांचे मोबाइल नंबर नलावडे यांनी मागितले होते. संचालनालयाने चार अधिकाऱ्यांचे कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक दिले आहेत.रविवारी कार्यालयास सुटी असते. तसेच महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी कार्यालय बंद असते. महिन्यातील सुटीच्या सहा दिवशी या अधिकाऱ्यांशी संपर्क साधायचा असल्यास कसा साधावा, असा सवाल नलावडे यांनी केला. >एमआयडीसी-संचालनालयात गोंधळ कारखानदारांनी मार्जिन स्पेसचे उल्लंघन करून अनेक ठिकाणी बॉयलर उभारल्याची माहिती नलावडे यांनी एमआयडीसीकडे विचारली होती. त्यावर, ही बाब तपासणे आमचे काम नसल्याचे उत्तर एमआयडीसीने दिले होते. तोच प्रश्न औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयास विचारला असता मार्जिन स्पेसचे उल्लंघन झाले असल्यास कारखानदारांच्या विरोधात कारवाई करण्याचे काम एमआयडीसीचे आहे, असे उत्तर संचालनालयाने दिले आहे. एमआयडीसी व संचालनालयाकडून एकमेकांवर जबाबदारी ढकलली जात आहे, हेच स्पष्ट होते. दोन्ही सरकारी संस्था टोलवाटोलवी करून नागरिकांच्या जीविताशी खेळ करत असल्याचा नलावडे यांचा आरोप केला. संचालनालयाने माहिती देणे टाळले.>पाच कारखाने अतिधोकादायकडोंबिवलीमधील ४३७ कारखान्यांपैकी पाच कारखाने अतिधोकादायक असल्याची माहिती संचालनालयामार्फत देण्यात आली असून त्यात अ‍ॅच्युटेल प्रॉडक्ट लि., गणेश पॉलिकेम इंडस्ट्रीज, मेट्रोपॉलिटीन एक्झाकेम, क्वालिटी इंडस्ट्रीज आणि घरडा केमिकल्स या पाच रासायनिक कारखान्यांचा समावेश आहे.