शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

नियोजनाअभावी सांगली, कोल्हापूरमध्ये महापूर; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 12:36 AM

नेरुळ येथे राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत सरकारवर टीका

नवी मुंबई : सांगली आणि कोल्हापूर येथे आलेल्या महापुराचे कारण म्हणजे अलमट्टी धरण भरले आहे. धरणाचे दरवाजे उघडले तर कोयना धरणातून होणारा विसर्ग अलमट्टीकडे निघून जाईल, एवढे जर सरकारला कळत नसेल तर ही राज्यव्यवस्था सांभाळता कशाला? असा टोला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारला लगावला आहे. गुरु वारी नेरुळ येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवी मुंबई कार्यकर्ता आढावा बैठकीत ते बोलत होते.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आमदार संदीप नाईक यांनी पक्षांतर केल्यानंतर माजी मंत्री गणेश नाईकही पक्षांतर करणार असून त्यांच्यासोबत शहरातील अनेक नगरसेवक पक्षांतर करणार आहेत, त्यामुळे शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी कार्यकर्ता आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी आव्हाड यांनी नाईक यांच्यावर निशाणा साधत टीका केली. सत्तेसाठी नेत्यांनी जरी पक्षांतर केले तरी कार्यकर्ते कोठेही जात नसल्याचे आव्हाड म्हणाले.नाईक यांच्याकडून अनेक वेळा अपमान झाला असून, पवारांसाठी मी खूप अपमान सहन केल्याचे त्यांनी सांगितले. नवी मुबई शहराचा कधी इतिहास लिहिला गेला तर वसंतराव नाईक आणि शरद पवार ही नावे पुढे येतील. नवी मुंबईतील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा इतिहास जागे करण्याचे आवाहन त्यांनी केले. किल्लारी येथे झालेल्या भूकंप दुर्घटनेच्या वेळी राबविण्यात आलेल्या मदतकार्यात सर्व परिस्थिती शरद पवार यांनी हाताळली होती, त्यामुळे अशा परिस्थितीचा त्यांना मोठा अनुभव आहे. उत्तराखंडमध्ये आलेल्या प्रलयानंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी पवार यांच्यावर डिगास्टर मॅनेजमेंट सांभाळण्याची जबाबदारी दिली होती. त्याचप्रमाणे सातारा, सांगली, कोल्हापूर येथील महापुरात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी डिगास्टर मॅनेजमेंट सांभाळण्याची जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पवार यांच्याकडे द्यावी, असे आवाहन आव्हाड यांनी केले.शरद पवार यांनी आजवर अनेक नेते मोठे केले असून त्यांनी पक्षाला सोडल्यानंतरही कार्यकर्ता जागेवरच राहिला असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्रात पुढे जाण्यासाठी राष्ट्रवादीचे ताकदीचे नेते आणि पदाधिकारी फोडले जात आहेत, असे ते म्हणाले. गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीतच राहण्याचे आवाहन त्यांनी केले. या आढावा बैठकीला राष्ट्रवादीचे नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील, काँग्रेसचे माजी नगरसेवक संतोष शेट्टी, राष्ट्रवादीचे नगरसेवक शंकर मोरे, नगरसेविका सपना गावडे, संगीता बोºहाडे, माजी नगरसेविका निर्मला गावडे, माजी नगरसेवक दिलीप बोºहाडे, विलास हुले, भालचंद्र नलावडे, भावना घाणेकर आदी मान्यवर आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सत्तेसाठी नेत्यांनी जरी पक्षांतर केले तरी कार्यकर्ते कोठेही जात नसल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी आढावा बैठकीत स्पष्ट केले.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरJitendra Awhadजितेंद्र आव्हाड