शहरं
Join us  
Trending Stories
1
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
2
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
3
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
5
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
6
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
7
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
8
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
9
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
10
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
11
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
12
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
13
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
14
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
15
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
16
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
18
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
19
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
20
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं

यादीतील घोळामुळे राडा

By admin | Published: February 22, 2017 4:52 AM

मतदार यादीतील गोंधळामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढलेली दिसून आली. वादावादीच्या घटनांप्रकरणी शहरातील विविध

मुंबई : मतदार यादीतील गोंधळामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढलेली दिसून आली. वादावादीच्या घटनांप्रकरणी शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल १४ अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे. निवडणुकीचे काम करत असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या कर्तव्यात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सायनच्या अ‍ॅन्टॉपहिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, परंतु शहरात कोणतीही गंभीर घडली नसल्याची माहिती मुंबई पोलीस प्रवक्ते अशोक दुधे यांनी सांगितले.मुलुंड पुर्वेकडील तरुण उत्कर्ष शाळेतील मतदान केंद्रावर वीज नसल्याची माहिती भाजपा आमदार सरदार तारासिंग यांना मिळाली. धिम्या गतीने सुरू असलेल्या सीस्टिमच्या कारभारामुळे मतदार वैतागले असताना येथील वीज गेली. तारासिंग यांनी केंद्रात धाव घेतली. सायंकाळी पाचच्या सुमारास तारासिंग मतदान केंद्रात पोहोचल्याचे समजताच, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या जवळपास १५० ते २०० कार्यकत्यांनी त्यांना घेराव घातला. त्यांच्या वाहनावरही दगडफेक करण्यात आली. यामध्ये तारासिंग यांना धक्काबुकी केल्याची माहिती तारासिंग यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मात्र, पोलिसांनी त्यांना बंदोबस्त पुरवून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तारासिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण फक्त तेथील कर्मचाऱ्यांना विजेअभावी मतदान थांबवू नये, असा सल्ला दिला आणि तेथून निघालो. मात्र, अन्य पक्ष कार्यकत्यांच्या मनात चुकीचा समज झाल्याने त्यांनी हा प्रकार केला आहे. या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली असल्याचेही तारासिंग यांनी सांगितले. मानखुर्दच्या पीएमजी कॉलनी परिसरातील म्हाडा कॉलनी येथील रहिवाशांचे मतदार यादीत नावच नसल्याने येथील रहिवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यातच ही बाब एमआयएमच्या उमेदवारांना समजताच, त्यांनी या विरुद्ध अन्य उमेदवाराचाच यामागे हात असल्याचे सांगत, या ठिकाणी गोंधळ घातला. दोन ते तीन तास या ठिकाणी गोंधळ सुरु असल्याने पोलिसांनी अधिक फौजफाटा तैनात केला. त्यानंतर, परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त शहाजी उमप आणि सहपोलीस आयुक्त देवेन भारती हेदेखील या ठिकाणी पोहोचले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर काही वेळ वातावरण थंड झाले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा रहिवाशांनी मतदान केंद्रच बंद करण्याची मागणी केल्याने पोलिसांना पर्यायी सौम्य लाठीचार्ज करावा लागला. त्यानंतर, येथील परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात पोलिसांना यश आले, तर विक्रोळीत पार्क साइट परिसरात शिवसेनेचे माजी विभागप्रमुख सुधीर मोरे यांच्याविरुद्ध तक्रार करणारे शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सुनील पाटील यांच्यावर हल्ला झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली. यामागे सुधीर मोरेंचा हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुनील पाटील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर भांडुपमधील मंदार शाळेतील मतदान केंद्रातील यादीतील घोळामुळे येथील केंद्र बंद पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे काही काळ येथील परिसरात शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर मारामारीत झाले. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी घेत यावर नियंत्रण आणले. (प्रतिनिधी)