शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

अरुंद पुलामुळे प्रवाशांची घुसमट, अपु-या सोईसुविधांमुळे रुग्णांसह धारावीकरांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 6:32 AM

मोठ्या प्रमाणात गर्दी असलेल्या रेल्वे स्थानकांपैकी एक म्हणजे सायन रेल्वे स्थानक. दररोज सकाळी ७ वाजल्यापासून ते दुपारी ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ५ वाजल्यापासून या स्थानकावर प्रचंड गर्दी पाहायला मिळते.

अक्षय चोरगे मुंबई : मोठ्या प्रमाणात गर्दी असलेल्या रेल्वे स्थानकांपैकी एक म्हणजे सायन रेल्वे स्थानक. दररोज सकाळी ७ वाजल्यापासून ते दुपारी ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ५ वाजल्यापासून या स्थानकावर प्रचंड गर्दी पाहायला मिळते. धारावीकरही या स्थानकाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. त्यातच सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात रेल्वेने येणारे रुग्णदेखील सायन रेल्वे स्थानकात उतरतात. त्यामुळे गर्दीत अधिक भर पडते. अरुंद पुलावरून या रुग्णांना रुग्णालयाकडे नेताना नातवाइकांची दमछाक होते. अपुरे तिकीटघर, प्रसाधनगृहांची दुरवस्था अशा अनेक असुविधांमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.सायन रेल्वे स्थानकावर दोन पादचारी पूल आहेत, त्यापैकी उत्तरेकडील पुलाचा फारच कमी वापर होतो. परिणामी, दक्षिणेकडील पुलावर नेहमी कोंडी होते. सकाळी आणि सायंकाळच्या वेळी या पुलावर धक्काबुक्की होते. महिला आणि ज्येष्ठांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याची खंत महिला प्रवाशांनी व्यक्त केली. धारावीकरांनाही सायन हे जवळचे स्थानक आहे. वाढती गर्दी व अरुंद पूल लक्षात घेता, येथे स्कायवॉकची सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसेच रुग्णांसाठी लिफ्ट, सरकत्या जिन्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.गेल्या आठवड्यात रेल्वेच्या विभागीय रेल्वे अधिकाºयांनी स्थानकाची पाहणी करून अहवाल तयार केला आहे. लवकरच सायन रेल्वे स्थानकात पुनर्विकासाचे काम सुरू होणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. लोकमान्य टिळक रुग्णालयात ये-जा करणाºयांसाठी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासादरम्यान लिफ्टची व्यवस्था करण्यात येणार असल्याचीही माहिती मिळाली आहे.प्रसाधनगृहांची दुरवस्थारेल्वे स्थानकावरील प्रसाधनगृह लहान व अतिशय अस्वच्छ असल्याने, प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. प्रवाशांच्या सोयीसाठी चांगले प्रसाधानगृह बनवावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.सायन स्थानकातील उत्तरेकडील पादचारी पुलावर गर्दुल्ले ठाण मांडून बसतात. रेल्वे पोलीस त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने, महिला प्रवासी या पुलाचा वापर करणे टाळतात, असे महिला प्रवाशांनी सांगितले.>सूचना, तक्रारी, व्हिडीओ‘लोकमत’च्या वाचकांच्या ‘मुंबईचा ºहास आता बास’ या मालिकेसंदर्भात काही सूचना, प्रतिक्रिया असल्यास८८४७७४१३०१या क्रमांकावर कळवाव्या. लोकल स्थानकांच्या तक्रारीही या क्रमांकावर पाठवता येतील. स्थानकांतील समस्यांचे व्हिडीओदेखील वाचक या क्रमांकावर पाठवू शकतात.>कारवाईत सातत्य हवेरेल्वे स्थानकावर येणाºया सर्वच मार्गांवर आणि पादचारी पुलांवर फेरीवाले बसतात. गेले काही दिवस कारवाई करण्यात येत असल्याने, फेरीवाल्यांची संख्या कमी झाली होती, परंतु या कारवाईत सातत्य हवे. कारण फेरीवाल्यांमुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात कोंडी होती. त्यामुळे फेरीवाल्यांचा कायमचा बंदोबस्त होणे आवश्यक असल्याचे प्रवासी गीता संसारे यांनी सांगितले.>तिकीट घर हवे : रेल्वे स्थानकावर दोन तिकीट घरे आहेत, परंतु तिकीट खिडक्यांसमोर भल्या मोठ्या रांगा लागतात. वेळ कोणतीही असो, तिकीट घरासमोरील रांगा काही केल्या कमी होत नाहीत. प्रवाशांच्या सोयीसाठी एटीव्हीएम आहेत, परंतु त्यापैकी अर्ध्या मशिन नेहमी बंद असतात. त्यामुळे अजून एक तिकीट घर असावे, तसेच बंद पडलेल्या एटीव्हीएम दुरुस्त करावे, अशी मागणीही प्रवासी करत आहेत.>पुलाची मागणीसायन रेल्वे स्थानकाची पाहणी करून, रेल्वे स्थानकावरील प्रसाधनगृहाची डागडुजी करावी आणि प्रसाधनगृह नेहमी स्वच्छ ठेवावे, याबाबत रेल्वेला सूचना दिल्या. रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलांच्या रुंदीकरणासह धारावी येथील संत रोहिदास मार्गापासून ते सायन रेल्वे स्थानकापर्यंत पूल बांधावा, अशी मागणीही केली आहे. महापालिका या पुलासाठी अनुकूल आहे.- राहुल शेवाळे, खासदार>नवे रेल्वे स्थानक हवेसायन ते माटुंगा हे खूप मोठे अंतर आहे. या दरम्यान एक नवे रेल्वे स्थानक बनवावे, अशी मागणी रेल्वेकडे केली आहे, ज्यामुळे धारावीमधील नागरिक नव्या स्थानकाचा वापर करतील. असे केल्यास सायन रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. स्थानिक आमदार तमिळ सेल्व्हन यांच्यासह रेल्वे स्थानकाची पाहणी करून पादचारी पुलाचे रुंदीकरण करावे, पूर्वेकडील स्कायवॉक रेल्वे स्थानकाला जोडावा, अशा मागण्या रेल्वे अधिकाºयांकडे केल्या आहेत.- राजेश्री शिरवाडकर, नगरसेविका>दुभाजकाची गरजस्थानकावरील फेरीवाल्यांचा बंदोबस्त करावा. दक्षिणेकडील पादचारी पुलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. सकाळी आणि सायंकाळी या पुलावर कोंडी होते. गर्दीचे व्यवस्थापन व्हावे, याकरिता पुलावर दुभाजकाची गरज आहे.- प्रदीप पोटे, प्रवासी>पुलाचा विस्तार करावारेल्वे स्थानकावरील उत्तरेकडील पादचारी पूल लाल बहादूर शास्त्री मार्गापर्यंत वाढविला, तर त्या पुलाचा वापर होईल, तसेच या पुलावरील गर्दुल्ल्यांवर कारवाई व्हावी. स्थानकामधून बाहेर जाण्यासाठी नवा पादचारी पूल उभारावा.- प्रदीप पांडे, प्रवासी

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीAccidentअपघात