ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4- चित्रपटसृष्टीत ठसा उमटवणारे कलाकार दिग्दर्शक समाजाप्रति संवेदनशील असतात. मसान चित्रपटसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा दिग्दर्शक नीरज घायवान यानं मिळालेल्या पुरस्कारातील रकमेपैकी 50 हजारांची रक्कम दुष्काळग्रस्तांसाठी देऊ केली आहे.
नीरज घायवान यानं पदार्पणातील सर्वोकृष्ट चित्रपट दिग्दर्शक होण्याचा बहुमान मिळाला आहे. त्यांना पुरस्काराच्या स्वरूपात 1.25 लाखांची रक्कम मिळाली आहे. त्यापैकी त्यांनी 50 हजार रुपये दुष्काळग्रस्तांना देण्याचं जाहीर केलं आहे. नीरज घायवान यांनी अशी माहिती टि्वटरच्या माध्यमातून दिली आहे.
मी देऊ केलेली रक्कम ही फारच कमी आहे, मात्र त्या गोष्टीतून दुष्काळग्रस्तांकडे समाजाचं लक्ष वेधण्याचा माझा प्रयत्न असल्याचं टिवटरच्या माध्यमातून नीरज घायवान यांनी सांगितलं आहे.
Of course, it's a small amount, but my intent to make it public is to draw attention to agrarian crisis & encourage possible contributions.— Neeraj Ghaywan (@ghaywan) May 4, 2016
Out of the 1.25 Lakh prize money, I will donate 50,000. Together, me and @varungrover will donate 1 Lakh rupees.— Neeraj Ghaywan (@ghaywan) May 4, 2016
Me and @varungrover have decided to donate our National Award prize money towards relief work for distressed farmers in Maharashtra.— Neeraj Ghaywan (@ghaywan) May 4, 2016