वडखळ : मुंबई-गोवा महामार्गाचे काम २०११ पासून सुरू झाले. नव्याने बनविण्यात आलेला रस्ता व जुन्या रस्त्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे तसेच गेल्या काही वर्षांपासून महामार्गाचे चांगल्या पध्दतीने डांबरीकरण न झाल्याने मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. महामार्गावर पेण ते वडखळ, नागोठणे महामार्गावर पडलेल्या या खड्ड्यांमुळे अनेक वाहने नादुरु स्त होवून याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणात जाणारा महत्त्वाचा मार्ग आहे. तसेच कोकणच्या विकासाला चालना देणारा हा एकमेव रस्ता आहे. याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने या महामार्गाचे काम रखडले आहे. महामार्गाच्या झालेल्या दुरवस्थेकडे शासन व लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने या महामार्गावर दरवर्षी शेकडो प्रवाशांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. या महामार्गावर दुचाकीस्वारांचे अपघाताचे प्रमाण अधिक आहे. महामार्गावर वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. महामार्गाचे काम कासव गतीने सुरू असून ते निकृष्ट दर्जाचे केले गेले असल्याने पावसाच्या दणक्याने महामार्गावर खड्डे पडल्याने प्रवाशांना व वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई - गोवा महामार्गावर पेण ते वडखळ, नागोठणे येथे पडलेल्या या खड्ड्यांमुळे अनेक वाहने नादुरु स्त होत आहेत. आता दिवाळीची सुटी असल्याने सहलीचा प्रारंभ झाला असून या सहलीसाठी पर्यटकांची पसंती अलिबाग-मुरु ड या ठिकाणांना असल्याने या महामार्गावर वाहतूक वाढली आहे. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. या महामार्गाची दुरु स्ती करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण
By admin | Published: November 03, 2016 2:51 AM