परभणी : दहावी परीक्षेतील विज्ञान विषयाचा पेपर फुटल्याचे वृत्त ‘लोकमत’सह अन्य एका वृत्तपत्राने प्रकाशित केल्याच्या कारणावरुन माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी माधव सलगर यांच्या फिर्यादीवरुन परभणी पोलिसांत वृत्तपत्रांविरुद्धच गुन्हा नोंदवला आहे. पेपर फुटीला आळा घालण्याऐवजी त्याची माहिती प्रसारित करणाऱ्या वृत्तपत्रांनाच आरोपीच्या पिंजºयात उभे केले.१४ मार्च रोजी विज्ञानाचा पेपर परीक्षा सुरु होण्यापूर्वीच फुटल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १५ मार्चच्या अंकात प्रसिद्ध केले होते. व्हॉटस्अॅपवर व्हायरल झालेल्या या पेपरचा स्क्रीन शॉटही वृत्तामध्ये प्रकाशित करण्यात आला होता. त्या दृष्टीकोनातून शिक्षण विभागाने कोठून पेपर फुटतो, यासाठी कोण जबाबदार आहे, याची गांभीर्याने चौकशी करुन त्यानंतर दोषी असणाºयांविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये रितसर तक्रार नोंदविणे अपेक्षित होते. परंतु,तसे न करता पेपर फुटल्याची माहिती प्रसारित करणाºया ‘लोकमत’ व अन्य एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधीविरुद्ध सलगर यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.खातरजमा करुनच दिले वृत्त‘लोकमत’ने वृत्त देताना माध्यमिकचे शिक्षणाधिकारी बी.आर.कुंडगीर यांची १४ मार्च रोजी सकाळी ११.२३, तसेच सायंकाळी ७.२३ च्या सुमारास दोन वेळा फोन करुन प्रतिक्रिया घेतली होती. तशी माहितीही वृत्तामध्ये त्यांच्या नावासह प्रसिद्ध करण्यात आली. व्हॉटस्अॅपवरुन व्हायरल झालेली प्रश्नपत्रिका आणि परीक्षा संपल्यानंतर मिळालेली मूळ प्रश्नपत्रिका सारखीच असल्याची खात्री केल्यानंतरच ‘दहावीचा विज्ञान विषयाचा पेपर फुटला’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते.
पेपर फुटल्याची बातमी छापल्याने गुन्हा दाखल, शिक्षण विभागाचा उलटा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 1:45 AM