शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

लागले रे लागले ... लातुरात गाढवाचे लग्न लागले...!

By admin | Published: August 03, 2016 5:06 PM

शहरातील मुस्लिम समाजासाठी प्रस्तावित शादीखान्याचे उद्घाटन होऊनही अद्यापही शादीखाना बांधण्यात आला नाही. याचा राग आलेल्या कार्यकर्त्यांनी चक्क गाढवाचं लग्न लावलं.

ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. ३ -  शहरातील मुस्लिम समाजासाठी प्रस्तावित शादीखान्याचे उद्घाटन होऊनही अद्यापही शादीखाना बांधण्यात आला नाही. याचा राग आलेल्या कार्यकर्त्यांनी चक्क गाढवाचं लग्न लावलं. पत्रिका छापल्या. बँड लावला आणि वर्हाडींच्या उपस्थितीत लग्न लागताच ताशावर नृत्य करून आनंदही साजरा केला.
महापालिकेच्या वतीने शहरातील शाहु चौक परिसरातील लाल गोडावूनच्या जागेत शादिखाना बांधण्याचा सर्वसाधारण सभेत ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता.  त्यानुसार शादीखान्याचे उद्घागटन आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले होते़ उद्घागटनाचा सोपस्कार पूर्ण होऊन दहा महीने झाले तरी त्याचे बांधकाम काही सुरू झाले नाही. त्यामुळे शादीखान्याचे आश्वासन हवेतच राहिले आहे़. महापालिकेच्या याच दुर्लक्षाच्या निषेधार्थ महाराष्ट्र विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी शादीखान्याच्या प्रस्तावीत जागेत गाढवाचा विवाह आयोजित करण्यात आला होता़ त्यासाठी लग्नपत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. या विवाहासाठी  शामियाना मंडप उभारण्यात येऊन वाजंत्रीही होते. कार्यकर्त्यांनी दोन गाढवांना बाशिंग बांधून, गळ्यात गुलाबाच्या फुलांचे हार घालून लग्न लावले. या लग्नाची शहरात मात्र चांगलीच चर्चा रंगली. 
यावेळी कार्यकर्त्यांसह विवाह समारंभाला  अनेकांची उपस्थिती होती. 
यावेळी महाराष्ट्र विकास अघाडीचे शहराध्यक्ष शेख इस्माईल फुलारी, नगरसेवक नवनाथ अल्टे, मुस्लिम विकास परिषदेचे मोहसीन खान, मुस्लिम योद्धचे वाजीद मणियार, इरफान शेख, मोहम्मद गौस, नाजीम शेख, जमीर सय्यद, ताहेर सय्यद, उमर कलाल, शार्दुल शेख, रियाज शेख, रफिक शेख, समिर शेख, विशाल कांबळे, अबेद शेख, महाराष्ट्र विकास अघाडीचे कार्यकर्ते, नागरिक मोठ्या सख्येने उपस्थित होते.