शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
3
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
4
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
5
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
6
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
7
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
8
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
9
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
10
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
11
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
13
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
14
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
15
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
16
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
17
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
18
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
19
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
20
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?

दुबार पेरणीचे शेतकऱ्यांवर संकट

By admin | Published: June 27, 2016 2:06 AM

दोन दिवस झालेल्या दमदार पावसाने सगळ्यांना आनंद झाला असला तरीही पावसाची प्रतीक्षा करणारा अन्नदाता यामुळे संकटात सापडला आहे.

पेण : दोन दिवस झालेल्या दमदार पावसाने सगळ्यांना आनंद झाला असला तरीही पावसाची प्रतीक्षा करणारा अन्नदाता यामुळे संकटात सापडला आहे. खारभूमी क्षेत्रातील ९३ गावांची शेतीमधील केलेली धूळ पेरणीचा पाहणी दौरा पेण तालुका कृषी विभागाने नुकताच केला असता तब्बल ९०० हेक्टर क्षेत्रावरील धूळ पेरणीची अवस्था बिकट झाली असल्याचे अधिकारी व कृषी सहाय्यकांच्या पथकाला आढळले. याबाबतचा अहवाल कृषी विभागाने सादर केला असल्याचे तालुका कृषी कार्यालयीन सूत्रांनी सांगितले. यामुळे पेणच्या खारभूमी क्षेत्रातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे नवे संकट कोसळले आहे. खारभूमी क्षेत्रातील शेती करणे शेतकऱ्यांसाठी आतबट्ट्याचा व्यवहार झाला आहे. दरवर्षी ही समस्या कायम उद्भवते. मात्र गतवर्षी पाऊस टप्प्याटप्प्याने पडल्याने खारभूमी शेतीतील पेरणी वाचली व पीक चांगले आले होते. यावर्षीचा जूनच्या प्रारंभी ११ जून रोजी एकदाच पडलेला मृग नक्षत्रातील पाऊस नंतर १३ दिवस दांडी मारून हजर झाला. खारभूमी क्षेत्रातील केलेली भात पेरणी भिजून नंतर पावसाचा शिडकावा न झाल्याने भात बियाणाचे अंकुर फुटले नसून या बियाणाला बुरशीची लागण होवून संपूर्ण केलेला पेरा वाया गेला. चांगल्या प्रतवारी असलेल्या जमिनीत भाताचे नर्सरी रोपे चांगली बहरली दिसत असताना, खारभूमी क्षेत्रातील शिवारात ओसाड परिस्थिती दिसत होती. याबाबत शेतकरीवर्गाने तालुका कृषी विभागाकडे या बाबतीत परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लक्ष वेधले असता तालुका कृषी कार्यालयाचे पथकाने या क्षेत्राची पाहणी केली. ९३ गावातील पाहणी करून ९०० हेक्टर खारभूमी क्षेत्रातील धूळ पेरणी वाया गेल्याचा अहवाल शासनास सादर केला आहे. यंदाच्या खरीप हंगामात पेण तालुक्यातील एकूण १३ हजार १०० हेक्टर क्षेत्रापैकी १२ हजार ८०० हेक्टरवर भात लागवडीचे उद्दिष्ट असून यामध्ये ९ हजार १७६ हेक्टर क्षेत्राचा समावेश खारभूमी क्षेत्रात होतो. यामधील ८ हजार ९९७ हेक्टर क्षेत्राची पाहणी तालुका कृषी विभागाने करून भात बियाणे पेरणी नष्ट झाल्याचा अहवाल ठाणे विभागीय कृषी संचालक यांना ठाणे येथील बैठकीत सादर केला आहे.यावर्षीचा पाऊस चांगला होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी महागडी बियाणे खरेदी करून धूळ पेरणी केली होती. आर्द्रा नक्षत्राचा पाऊस चांगला पडत असल्याचे डोळ्यादेखत दिसत असतानाच खारभूमी क्षेत्रातील ९०० हेक्टरवर असा दुबार पेरणीसाठी बियाणांची शोध मोहिमेची लगबग सुरु आहे. शासनाने यासाठी तातडीची प्रासंगिक मदत म्हणून बियाणे व खते उपलब्ध करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी शेतकऱ्यांनी शासन दरबारी मागणी आहे. (वार्ताहर)> तालुका कृषी विभागाचा अहवाल सादरतालुका कृषी कार्यालयाचे पथकाने या क्षेत्राची पाहणी केली. ९३ गावातील पाहणी करून ९०० हेक्टर खारभूमी क्षेत्रातील धूळ पेरणी वाया गेल्याचा अहवाल शासनास सादर केला आहे. तालुका कृषी विभागाने भात बियाणे पेरणी नष्ट झाल्याचा अहवाल दिला आहे.यंदाच्या खरीप हंगामात पेण तालुक्यातील एकूण १३ हजार १०० हेक्टर क्षेत्रापैकी १२ हजार ८०० हेक्टरवर भात लागवडीचे उद्दिष्ट असून यामध्ये ९ हजार १७६ हेक्टर क्षेत्राचा समावेश खारभूमी क्षेत्रात होतो. त्यापैकी ८ हजार ९९७ हेक्टर क्षेत्राची पाहणी के ली.