'त्या' आंदोलनावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्येच जुंपली; लोढेंनी मलिकांना लगावला टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 12:22 PM2022-02-15T12:22:52+5:302022-02-15T12:23:10+5:30

कोणत्याही राजकीय पक्षाने अथवा राजकीय नेत्यांनी इतर नेत्यांच्या अथवा पक्षाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणे चुकीचे आहे असं राष्ट्रवादीनं म्हटलं.

Due to Protest front of Devendra Fadnavis Bunglow the Congress-NCP clashed | 'त्या' आंदोलनावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्येच जुंपली; लोढेंनी मलिकांना लगावला टोला 

'त्या' आंदोलनावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्येच जुंपली; लोढेंनी मलिकांना लगावला टोला 

googlenewsNext

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा निषेध म्हणून काँग्रेसने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यावरून दोन दिवसांपासून भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगला होता. त्यात सोमवारी सायंकाळी राष्ट्रवादीने उडी घेतली. नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन चुकीचे असल्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतल्याने दिवसा अखेरीस राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस अशी टोलेबाजी सुरू झाली.

कोणत्याही राजकीय पक्षाने अथवा राजकीय नेत्यांनी इतर नेत्यांच्या अथवा पक्षाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणे चुकीचे आहे. अशाप्रकारे आंदोलने करणे योग्य नाही. नेत्यांची घरे किंवा कार्यालयांबाहेर आंदोलनाचे अलीकडे सुरू झालेले प्रकार चुकीचे आहेत, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे. अशा प्रकारच्या आंदोलनांमुळे पोलीस प्रशासनावर विनाकारण ताण येतो, असे राष्ट्रवादी काँग्रेस मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. 

हे तेव्हा का नाही  सुचले - अतुल लोंढे 
ज्या पद्धतीने अर्वाच्य भाषा भाजप नेत्यांनी वापरली, मारहाणीची धमकी दिली त्याबद्दल नवाब मलिक यांनी नाराजी व्यक्त केली असती तर जास्त सयुक्तिक झाले असते. पंतप्रधान मोदींचे वक्तव्य आणि त्यावर भाजप नेत्यांचे मौन याचा निषेध करण्यासाठी आम्ही गेलो होतो. मुळात नेत्यांची घरे किंवा पक्ष कार्यालयावर आंदोलने नेण्याची प्रथा भाजपने सुरू केली आहे. यापूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलनाचा प्रयत्न झाला होता. भाजपने काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या टिळक भवन कार्यालयाबाहेर आंदोलन केले. त्यावेळी नवाब मलिक यांनी विरोध केला असता, टीका केली असती तर बरे झाले असते.

Web Title: Due to Protest front of Devendra Fadnavis Bunglow the Congress-NCP clashed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.