शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
3
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
4
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
5
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
6
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....
7
सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांना मोठा दिलासा, मदरसा कायदा घटनात्मक घोषित; हायकोर्टाचा निर्णय फिरला
8
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
9
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
10
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
11
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
12
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
13
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
14
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
15
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
16
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
17
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
18
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
19
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
20
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता

बाळासाहेबांची काँग्रेस की नानांची काँग्रेस?; नाशिकमधील कार्यकर्त्यांची खदखद उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2023 4:19 PM

नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांना पक्षभेद विसरत अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी छुपी मदत केल्याचं बोललं जात आहे.

नाशिक - विधान परिषदेच्या ५ जागांसाठी अलीकडेच निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष नाशिक पदवीधर मतदारसंघाकडे लागले होते. ऐन निवडणुकीत काँग्रेस पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज न भरता अपक्ष उभे राहिलेल्या मुलाला पाठिंबा दिला. तांबे यांच्या धक्कादायक खेळीमुळे काँग्रेसनं पिता-पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या विजयानंतर आता कार्यकर्त्यांमधील खदखद बाहेर येऊ लागली आहे. 

काँग्रेसमधील राजकारणामुळे तांबे कुटुंबियांवर अपक्ष उभे राहण्याची वेळ आली असा आरोप आमदार सत्यजित तांबे यांनी केला होता. त्यानंतर बाळासाहेब थोरातांनीही विधान परिषद निवडणुकीत पक्षीय राजकारण झाले असा आरोप केला. त्यामुळे काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. त्यात काँग्रेस प्रवक्त्या आणि नाशिकच्या माजी नगरसेविका हेमलता पाटील यांनी या प्रकारावर सूचक ट्विट केले आहे. 

हेमलता पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, आज सकाळी सकाळी फोन आला "ताई आपण बाळासाहेबांच्या कॉंग्रेसचे काम करायचे की नानांच्या कॉंग्रेसचे?"आता काय उत्तर देऊ कप्पाळ? असं सांगत नाशिकमधील काँग्रेस कार्यकर्त्यांची खदखद उघड केली आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांना पक्षभेद विसरत अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी छुपी मदत केल्याचं बोललं जात आहे. संगमनेर तालुक्यात बाळासाहेब थोरात यांची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे नाशिक तसेच उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये थोरातांचे वर्चस्व आहे. मात्र विधान परिषद निवडणुकीत घडलेल्या राजकारणामुळे याठिकाणी पक्षाला गटबाजीचा फटका बसला आहे. 

काय म्हणाले बाळासाहेब थोरात?राज्यात नुकतीच विधान परिषदेची निवडणूक झाली. त्यात खूप राजकारण झालं. या निवडणुकीत सत्यजित चांगल्या मताने विजयी झाला. त्याचं आम्ही अभिनंदन करतो. मात्र या निवडणुकीत जे राजकारण झालं ते मला व्यथित करणारं आहे. त्याबाबतच्या भावना मी पक्षश्रेष्ठींना कळवल्या आहेत, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. तसेच नाना पटोलेंसोबत काम करणं अशक्य झालंय, असंच सुरू राहिल्यास काँग्रेसमध्ये दोन गट पडतील, असा सूचक इशाराही बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना लिहिलेल्या पत्रामधून दिल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातNana Patoleनाना पटोलेSatyajit Tambeसत्यजित तांबे