पुणे : सध्याच्या काळात मोबाईल हा प्रत्येकाच्याच आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाला आहे. घोळक्यात असतानाही माणसे अनेकदा मोबाईलवरच लक्ष खिळवून असतात. अशा परिस्थितीत पती-पत्नींच्या नाजूक नात्यांवर छोटेखानी मोबाईल भारी पडत आहे. सातत्याने मोबाइलवरून बोलणे, व्हॉट्स अॅपवरून चॅटिंग आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गैरसमजूती, विसंवाद आणि वाढणारा संशय हे पती-पत्नींमधील कौटुंबिक वादाचे महत्त्वाचे कारण ठरत आहे. कौटुंबिक न्यायालय आणि महिला तक्रार निवारण कक्षाकडे आलेल्या तक्रारी आणि दावे यावरून ही गोष्ट समोर आली आहे. कौटुंबिक न्यायालयात दाखल होणाऱ्या एकूण दाव्यांपैकी ४० टक्के वादाचे कारण मोबाइल असल्याचे आढळून आले आहे.आजच्या जमान्यात बहुतेक गोष्टींसाठी मोबाईलचा कॉल नव्हे तर एका मिसकॉलवर येऊन पोहचली आहे. त्यामुळे मोबाइल ही प्रत्येकाची गरज झाली आहे. अगदी सामान्यांच्या हातात हे यंत्र चपखलपणे बसले आहे. कामावर जाताना, एखाद्या दिवशी मोबाइल घरी विसरला की व्यक्ती अस्वस्थ होतो. आता स्मार्ट फोनचा व इंटरनेटचा जमाना आला आहे. त्यामुळे मोबाइलवरून संभाषणाबरोबरच व्हॉट्सअॅप चॅटिंग ही सर्रास गोष्ट झाली आहे. पण, हाच मोबाइल आता पती-पत्नीच्या वादाचे मोठे करण ठरू लागला आहे. केवळ उच्च शिक्षित किंवा मध्यमवर्गीय दाम्पत्यांमध्येच नव्हे, तर अशिक्षित वर्गातील पती-पत्नींमधील वादातही मोबाइल कारणीभूत ठरत असल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. पती-पत्नीमध्ये किरकोळ स्वरूपाचे वाद झाल्यानंतर ते दोघांमध्येच मिटणे आवश्यक असते. पण, किरकोळ व खासगी गोष्टीदेखील मुलीच्या माहेरी, बाहेरगावी असणाऱ्या दाम्पत्यांच्या घरी मोबाइलवरून लगेच समजतात. त्यामुळे लगेचच जावयाला/सूनेला फोन करून विचारणा केली जाते. यातून पुन्हा त्यांच्यात वाद होतात. त्यामुळे आशा दाव्यात समुपदेश ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट मानली जात आहे. (प्रतिनिधी)४याबाबत कौटुंबिक दाव्यांमध्ये काम करणाऱ्या वकील सुप्रिया कोठारी यांनी सांगितले, की कौटुंबिक न्यायालयात येणाऱ्या ४० टक्के दाव्यांत मोबाइल हे वादाचे कारण असल्याचे दिसून आले आहे. ४मोबाइलमुळे लोक लवकर जवळ येतात. त्यामुळे नको त्या गोष्टी घडत असतात. पती किंवा पत्नीचे बराच वेळ दुसऱ्याशी फोनवर बोलणे. रात्री उशिरापर्यंत व्हॉट्स अॅपवरून चॅटिंग करणे. ४या गोष्टींतून दोघांमध्ये विसंवाद वाढत जातो. संशय निर्माण झाल्यामुळे एकमेकांचे मॅसेज, चॅटिंग पाहिले जातात. अशी विविध कारणे पती-पत्नीच्या वादाची आढळून आली आहेत. ४पती किंवा पत्नी गुपचूप कोणाशी तरी चॅटिंग करते, याचा संशय आल्यानंतर मोबाइलची तपासणी होते व काही आक्षेपार्ह सापडल्यास वाद वाढत जातात. ४अशा प्रकारचे विविध दावे सध्या न्यायालयात सुरू आहेत. घटस्फोट घेणे ही पूर्वी भीती वाटण्याची गोष्ट होती. पण आता ही सहज गोष्ट मानली जाते. त्यामुळे परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचे प्रमाण ही वाढले आहे.
मोबाईलचा वापर ठरतेय घटस्फोटाचे कारण
By admin | Published: April 30, 2015 12:21 AM