शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
4
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
5
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
6
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
7
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
8
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
9
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
10
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
12
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
13
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
14
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
15
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
16
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
17
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
19
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
20
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार

जलसंधारणामुळे पाणीसाठे बनले दमदार

By admin | Published: June 05, 2017 1:14 AM

खेड तालुक्यातील सांडभोरवाडी, तिन्हेवाडी गावाला भौगोलिक देणगीतून मोठे वनक्षेत्र लाभले आहे

राजगुरुनगर : खेड तालुक्यातील सांडभोरवाडी, तिन्हेवाडी गावाला भौगोलिक देणगीतून मोठे वनक्षेत्र लाभले आहे. त्यात जलसंधारणाच्या कामाबरोबरच वृक्षलागवडही मोठ्या प्रमाणात झाली आहे. डोंगरकुशीत वनतळी, माती बंधारे, सिमेंट बंधारे त्याचबरोबर समतल चर झाल्याने माती, जमिनीची झीज थांबून मुरलेल्या पाण्यामुळे परिसरातील पाणीसाठे दमदार बनले आहेत.काही वर्षांपूर्वी टंचाईग्रस्त असलेल्या या गावात आता उन्हाळी बागायती पिके होऊ लागली आहेत. अन्नधान्याने समृद्धी वाढत असताना पूरक व्यवसायांनादेखील संधी मिळत आहे. दूध व्यवसाय, बी-बियाणे, खते विक्रीच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या संधी गावात उपलब्ध होऊ लागल्या आहेत.गावाच्या उत्तर बाजूने डोंगररांगा आहेत. यामध्ये २१२ हेक्टर वन क्षेत्र आहे. ८२ एकर गायरान आहे. या क्षेत्रात सन २०११ पासून वन विभाग आणि गावातील वनसंरक्षण समितीच्या माध्यमातून विविध प्रजातीची फळे देणारी आणि इमारतीसाठी लाकडाचा उपयोग होणारी ९२ हजार ६०० झाडे लावण्यात आली आहेत. यातील ९५ टक्के झाडे जिवंत आणि चांगल्या स्थितीत आहेत. तसा वन विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाचा अहवाल समितीकडे प्राप्त आहे. महाराष्ट्र शासनाने गतवर्षी २ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले. त्यात सहभाग घेताना सांडभोरवाडीने एकाच दिवशी ५२ हजार झाडांची लागवड करून विक्रम केला. गावातील महिला, मुलांचा त्यात उल्लेखनीय सहभाग होता.राजगुरुनगर विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी एम. जे. सणस, समितीचे निवृत्त सचिव बाळासाहेब निकम, सचिव आर. गोकुळे या सर्वांचे सहकार्य त्यांना लाभत आहे. या सर्व कामांची दखल घेऊन शासनाने सांडभोरवाडी वन संरक्षण समितीला पुरस्कार देऊन गौरविले आहे. राज्याचे वन, वित्त आणि नियोजनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या हस्ते पुण्यातील विधान भवन येथे २९ मे २०१७ रोजी या वन समितीला राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार समारंभ पूर्वक देण्यात आला. सांडभोरवाडी वन संरक्षण समितीच्या कामाची प्रेरणा इतर गावांनी घेण्यासारखी आहे.या शाळांमधील विद्यार्थीसुद्धा वन विभागाच्या उपक्रमात नेहमीच सहभागी होतात. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गावात वृक्षलागवड आणि संवर्धनाचे उपक्रम साजरे होतात. जनजागृतीतही विद्यार्थी अग्रभागी आहेत. घराभोवतीच्या रिकाम्या जागेत, शेताच्या बांधावर वृक्षलागवड होत आहे. त्याचे संवर्धन करताना विद्यार्थ्यांकडून पालकांकडे आग्रह धरला जातो. स्वयंपाक करण्यासाठी जळाऊ लाकडाची तोड थांबावी म्हणून गरज असेल अशा प्रत्येकाला वन विभागाच्या माध्यमातून वनसमितीने अनुदान तत्त्वावर कायमस्वरूपी गॅसजोड दिले आहेत. आता शंभर टक्के गॅस झाल्याने धूर आणि प्रदूषणमुक्त गाव झाले आहे.वन समितीच्या अध्यक्षा कविता पाचारणे या साडेचार वर्षांपूर्वी सांडभोरवाडीच्या सरपंच झाल्या. त्यानंतर सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन अवघ्या काही महिन्यांतच गावात ‘वनचेतना’ गृहाची उभारणी केली. या केंद्रात वन समितीच्या बैठका पार पडतात. एकत्र आल्याने वनसंवर्धनाचे धोरण आखले जाते. वन समितीच्या माध्यमातून जलसंधारण आणि वृक्षलागवडीची नियोजनबद्ध कामे केल्याने अप्रत्यक्षपणे गावात प्रत्येकाला वन क्षेत्राचा लाभ मिळत आहे.