शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
2
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
3
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
4
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
5
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
6
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
8
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
9
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
10
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
11
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
12
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
13
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
14
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
15
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
16
उदय सामंतांविरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला; पक्षप्रवेश होताच हाती मिळाला AB फॉर्म
17
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 
18
"मुलीला शिकवलंस तर सुशिक्षित नवरा कुठून आणणार?", लोकांचे टोमणे; मजुराची लेक झाली अधिकारी
19
Maharashtra vidhna Sabha 2024: शिंदेंच्या शिवसेनेचे पावशे निवडणूक लढविण्यावर ठाम
20
मोठी बातमी! "उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला, जो शब्द..."; संभाजी ब्रिगेडनं युती तोडली

दिल्ली प्रचारात ‘डमी’ अण्णा हजारे

By admin | Published: February 04, 2015 2:19 AM

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासारख्याच दिसणाऱ्या व्यक्तीचा प्रचारात वापर केला जात आहे

पारनेर (अहमदनगर) : दिल्ली विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासारख्याच दिसणाऱ्या व्यक्तीचा प्रचारात वापर केला जात असून, याबाबत दिल्लीतील कार्यकर्त्यांनी हजारे यांच्याकडे तक्रार केली असल्याचे समजते.अरविंद केजरीवाल यांच्या ‘आम आदमी पार्टी’ कडून अशा पद्धतीने कृती होत असल्याने हजारे समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे़ दिल्ली विधानसभेची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. जनलोकपाल आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण देशभर आपला ठसा उमटविणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे तत्कालिन सहकारी अरविंद केजरीवाल यांनी राजकारणात प्रवेश केला़ केजरीवालांच्या राजकारण प्रवेशाने हजारे व केजरीवाल यांच्यात दरी निर्माण झाली. सध्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत अण्णा हजारे यांच्या विचारांचा मोठा पगडा मतदारांवर आहे़ निवडणुकीत मतदार आकर्षित व्हावेत, या हेतूने केजरीवाल यांच्या कार्यकर्त्यांनी अण्णांसारखी दिसणारी एक व्यक्ती प्रचारात उतरविली आहे. दिल्लीतील हजारे समर्थकांनी राळेगणसिध्दीत त्याचे काही फोटो आहे़‘आप’ कडून अशाप्रकारे होणारा अण्णांचा वापर थांबवावा, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)