शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
3
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
4
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
5
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
6
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
7
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
8
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
9
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
10
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
11
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
12
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
13
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
14
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
15
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
16
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
17
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
18
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
19
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
20
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का

रुग्णदुपटीचा कालावधी ५४ वरून ६१ दिवसांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 7:17 AM

मुंबईकरांना दिलासा; ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम ठरते आहे प्रभावी 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गणेशोत्सवानंतर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी ९३ दिवसांवरून ५४ दिवसांवर आला होता. मात्र १५ सप्टेंबरपासून राज्यस्तरावर सुरू झालेली ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम मुंबईत प्रभावी ठरत असल्याचे दिसून येत आहे. घरोघरी जाऊन तापमान व प्राणवायूची तपासणी, बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध आणि अन्य प्रभावी उपाययोजनांमुळे आता ६१ दिवसांनंतर कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. 

आॅगस्ट महिन्यापर्यंत मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे चित्र होते. मात्र लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर तसेच गणेशोत्सव काळात नागरिकांचा सार्वजनिक ठिकाणी वावर वाढला. परिणामी, १ सप्टेंबरपासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली. त्यामुळे रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी दिवसेंदिवस कमी होत चालला होता. तसेच दैनंदिन वाढ ०.७५ वरून १.२८ टक्क्यांपर्यंत पोहोचली. त्यामुळे घरोघरी जाऊन तपासणी, ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणे, दररोज १५ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात येत आहेत.‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत पालिका कर्मचारी व दोन स्वयंसेवक असे सुमारे पाच हजार कर्मचारी घरोघरी जाऊन लोकांची आरोग्य तपासणी, त्यांच्यातील प्राणवायूचे प्रमाण तपासणे, सर्वेक्षण, मार्गदर्शन आणि आवश्यक कार्यवाही करीत आहेत. या मोहिमेत बाधितांच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे प्रमाणही वाढविल्याने त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत.

असा होईल मोहिमेचा फायदाप्रत्येक कुटुंबाशी संपर्क साधताना मिळालेली माहिती राज्य सरकारद्वारे या मोहिमेसाठी तयार करण्यात आलेल्या अ‍ॅण्ड्रॉईड आधारित मोबाइल अ‍ॅपमध्ये जतन केली जाईल. त्यामुळे उपलब्ध होणाऱ्या सर्व माहितीचे जलद गतीने विश्लेषण करणे शक्य होईल. परिणामी, कोविड नियंत्रण विषयक उपाययोजनांची अंमलबजावणी शक्य होईल.बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध : मोहिमेअंतर्गत बाधित रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे प्रमाण१० हजारांवरून २० हजारांपर्यंत आले. सर्व उपाययोजनांनंतर १५ सप्टेंबरला ५४ दिवसांवर असलेल्या रुग्णदुपटीचा काळ बुधवारी ६१ दिवसांवर आला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या