नारायण जाधव - ठाणेदेशात हिंदुत्ववाद्यांनी सर्वत्र धार्मिक वक्तव्ये करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डोकेदुखी वाढविली असतानाच आता केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या देशभरातील ९५५ राष्ट्रीय स्मारकांच्या ठिकाणी पूजा-अर्चा करण्यास मनाई केली आहे़ केंद्राच्या याच आदेशानुसार महाराष्ट्राच्या गृह विभागानेही राज्यातील अशा स्मारकांच्या ठिकाणी कुणी पूजा-अर्चा करू नये, म्हणून पुरातत्त्व विभागास तत्काळ पोलीस संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत़ गृह विभागाच्या या आदेशाचा सर्वात मोठा फटका ठाणे जिल्ह्णातील कल्याणच्या हाजीमलंग गडासह दुर्गाडी किल्ल्यात शिवसेनेकडून होणाऱ्या आरतीस बसणार आहे़ शिवाय, सातारा जिल्ह्णातील प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या कबरीवरून शिवसेनेकडून होणाऱ्या आंदोलनासही बसण्याची शक्यता आहे़यात ठाणे जिल्ह्णातील उपरोक्त स्मारकांच्या ठिकाणी शिवसेनेकडून दरवर्षी मुस्लिमबांधवासह पोलिसांचा विरोध असतानाही घंटानाद आणि आरती केली जाते़ हाजीमलंग आणि कल्याणच्या दुर्गाडीच्या आरतीवरून ठाण्यात शिवसेनेचे राजकारण जिल्ह्णात चांगलेच फोफावले आहे़ मात्र, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या एका अर्धशासकीय पत्रानुसार राज्याच्या गृहविभागाने अशा ठिकाणी पुरातत्त्व सर्वेक्षण विभागास तत्काळ पोलीस बंदोबस्त ठेवून संबंधित स्मारकाचे पावित्र्य जपून कायदा व सुव्यवस्था राखावी, असे परिपत्रक नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच काढले आहे़ च्मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहखात्याचा कारभार असल्याने ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करीत आक्रमक भूमिका घेणारा त्यांचा मित्रपक्ष असलेली शिवसेना काय भूमिका घेते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे़च्देशात सुमारे ३६८० राष्ट्रीय स्मारके असून, त्यापैकी ९५५ स्मारकांच्या ठिकाणी पूजा-अर्चा व आरतीच्या पठणासह घंटानाद केला जातो़ हाजीमलंग आणि कल्याणच्या दुर्गाडीच्या आरतीवरून ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे राजकारण फोफावले आहे़
दुर्गाडीवर पूजाअर्चेला बंदी
By admin | Published: January 04, 2015 2:03 AM