शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अमित शाहंच्या दौऱ्यादरम्यान लुडबुड पडली महागात; धुळे जिल्ह्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2022 9:40 AM

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह ५ सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर आले असताना कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. केवळ पास असलेल्या व्हीआयपी लोकांना कार्यक्रमाला प्रवेश दिला जात होता.

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर आले असताना त्यांच्या ताफ्यात ताेतया अधिकारी म्हणून वावरणाऱ्या धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यातील हेमंत पवार याला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पवार हा स्वत:ला आंध्र प्रदेशातील खासदाराचा स्वीय सहायक म्हणून त्याठिकाणी वावरत होता. त्याच्या ओळखपत्रावरून सुरक्षा रक्षकांना संशय आल्याने त्याला ताब्यात घेत  अटकेची कारवाई करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह ५ सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर आले असताना कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. केवळ पास असलेल्या व्हीआयपी लोकांना कार्यक्रमाला प्रवेश दिला जात होता. मात्र, हेमंत पवार हा तेथे पांढरा शर्ट आणि निळा कोट परिधान करून अधिकारी म्हणून वावरत होता. अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभवती पवार वारंवार दिसत होता. 

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर तब्बल तीन तास हेमंत पवार घुटमळत होता. शिवाय गणेश दर्शनासाठी अमित शाह गेल्यावर तेथेही पवार हा जवळपास वावरत होता. त्यामुळे अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी तैनात अधिकाऱ्यांना पवार याचा संशय आला. 

त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव हेमंत पवार सांगितले. तसेच आपण आंध्र प्रदेशच्या खासदारांचा स्वीय सहायक असल्याची माहिती दिली. मात्र, त्याच्याजवळ असलेले ओळखपत्र हे केंद्रीय गृह विभागाचे होते. त्यामुळे अधिक संशय आल्याने त्याला ताब्यात घेतले. चौकशीत तो तोतया अधिकारी म्हणून वावरत असल्याचे उघडकीस आले. यावरून मुंबई पोलिसांनी पवार याला ताब्यात घेत त्याच्याविरोधात भादंवि कलम १७०, १७१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे. 

कोण आहे हा पवार?- पवार हा उच्चशिक्षित आहे. त्याचे वडील पोस्टमन आहेत. हेमंत पवार याचे इंग्रजीसह विविध भाषांवर प्रभुत्व आहे. तो गेल्या काही वर्षापासून दिल्ली, मुंबई, हैद्राबाद अशा शहरात राहतो. - कधीतरी गावी येतो. तो गावात आपले दिल्ली, मुंबईतील मोठ्या नेत्याशी संपर्क असल्याचे सांगत असल्याचेही समोर आले आहे. - त्याने आतापर्यंत कुठे किती वेळा अशाप्रकारे ओळखपत्राचा वापर केला याबाबत अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शाहPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस