ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ : वर्षोन्वर्षे मुंबईला छळणाऱ्या खड्डे रोगातून बरं करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानांचा प्रयोग महापालिका करीत आहे़ मात्र एका कंपनीने प्रयोगाआधीच पळ काढला, तर दुसरे प्रयोग मुंबईच्या रस्त्यांवर तग धरत नसल्याने रस्ते विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणणाले आहेत़ त्यामुळे यंदाही खड्ड्यांवर कायमस्वरुपी तोडगा पालिकेला मिळालेला नाही़ दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकर खड्ड्यांचा जाच सहन करीत आहेत़ याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने पालिका प्रशासनाचे कान उपलटे़ त्यावेळी दोन आठवड्यांत खड्ड्यांवर कायमस्वरुपी तोडगा आणू, अशी ग्वाही पालिकेने दिली़ त्यानुसार नागपूरस्थित कंपनीने चार महिन्यांची गॅरेंटी देत प्रयोगाची तयारी दाखविली़ मात्र प्रयोगाआधीच त्या कंपनीने पळ काढल्यामुळे पालिका तोंडघशी पडली़ त्यामुळे आता अन्य तीन कंपन्यांच्या तंत्रज्ञानाचा प्रयोग तातडीने करण्यास पालिकेने सुरुवात केली आहे़
जयपूरस्थित शालिमार, कानपूरस्थित एआर थर्मो आणि आॅस्ट्रियाच्या इको ग्रीन कंपनीने या प्रयोगात भाग घेतला आहे़ परंतु या कंपनीने सादर केलेले खर्चाचे अंदाज पालिकेच्या बजेटपेक्षा अधिक आहेत़ त्याचबरोबर या कंपनींने केलेले कामही अद्याप समाधानकारक ठरु शकलेले नाही़ मात्र प्रयोगाची चाचपणी करण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे़ त्यामुळे यावर्षी तरी खड्ड्यांचा त्रास असाच मुंबईकरांना सहन करावा लागेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले़ प्रतिनिधी चौकट असा होईल प्रयोग या कंपन्यांना त्यांच्याकडे असलेल्या तंत्रज्ञानाद्वारे शहर व उपनगरातील खड्डे भरण्यास सांगण्यात आले आहे़ त्यानंतर याचा अहवाल तयार करण्यात येणार आहे़ यामध्ये त्या तंत्रज्ञानाने खड्डा भरण्यापूर्वी एका आठवडाआधी रस्त्याची स्थिती आणि तो खड्डा भरल्यानंतरची रस्त्याची स्थिती दर्शविण्यात येईल़.
त्यानंतर एक महिना या रस्त्यांचे निरीक्षण केले जाणार आहे़ मगच त्या खड्ड्यात भरलेले तंत्रज्ञान किती प्रभावी होते, याचा अहवाल तयार करुन स्थायी तांत्रिक सल्लागार समितीकडे (स्टॅक) अंतिम मंजुरीसाठी सोपविण्यात येणार आहे़ अशी आहे अडचण या तिन्ही कंपनींना ५० कोटी व त्याहून अधिक किंमतीचे कंत्राट हवे आहे़ मात्र पालिकेने पावसाळ्यापूर्वी खड्डे भरण्यासाठी २९ कोटी रुपये तर मान्सून काळात १७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे़ त्यामुळे या कंपनींचे तंत्रज्ञान यशस्वी ठरल्यास खड्ड्यांसाठी अधिक निधी मंजूर करण्यासाठी स्टॅक समितीची मंजुरी आवश्यक असणार आहे़ तोडगा नाहीच़़़ खड्डे भरण्यासाठी पालिकेने केलेला हा पहिला प्रयोग नाही़.
यापूर्वीही अनेक तंत्रज्ञानाद्वारे खड्डे भरण्यात आले आहेत़ मात्र सर्वच तंत्रज्ञान मुंबईच्या रस्त्यांवर फेल गेले आहेत़ त्यामुळे पालिकेने गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याच वरळी येथील डांबर तयार करण्याच्या कारखान्यातून मिश्रण घेऊन खड्डे भरण्यास सुरुवात केली़ खड्ड्यांची आकडेवारी विभागतक्रारशिल्लक शहर ८९२२२ पूर्व उपनगर १३४९९८ पश्चिम उपनगर ६९०२७ एकूण२९३११४७