मुंबई- एलफिन्स्टन रेल्वे स्टेशन पुलावरील चेंगराचेंगरीनंतर मुंबईतील लोकल वाहतूक सुधारणांसाठी राज ठाकरे यांनी आज मुंबईतील मेट्रो येथे मोर्चा काढला. त्यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतत राज्यातील प्रमुख शहरातील लाईट गेली. ठाणे, डोंबवली, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, सांगली-सातारा, सोलापूर सारख्या शहरात अनेक ठिकाणी बत्ती गुल झाली होती. या शहरातील तरुणांनी सोशल मीडियावर यावेळी संताप व्यक्त केला.
काही निवडक प्रतिक्रिया...
- एकटे राज ठाकरे बोलायला लागले तर एवढं घाबरले, जर उद्धव आणि राज एकत्र आले तर भाजपा राज्यातून संपेल.- वीज घालवण्यात भाजपा सरकारचा हात आहे. - मुख्यमंत्री साहेब लाईट घालवून उपयोग नाही आमच्याकडे स्मार्टफोन आहे.- सरकारला विनंती आहे! लाईट घालवली आता इंटरनेट पण बंद करा.- राज साहेबांनी केली हवा फुल सरकारची बत्ती गुल- कोंबडा झाकला म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही.- सगळ्या महाराष्ट्राची लाईट घालवली, राज ठाकरे बोलायला लागले की तुम्ही घाबरलात का?- राज ठाकरेला घाबरले का?- भाषणं ऐकतील म्हणून लाईट घालवली...- लाईट घालवली सरकारचा रडीचा डाव
राज ठाकरे यांनीही आपल्या भाषणात या बत्ती गुलचा उल्लेख केला आणि वीज घालवून काही होणार नाही, विरोधाचा सूर्य हा उगवणारच असे ठासून सांगितले.