शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

दौऱ्यावेळी अमित ठाकरेंच्या मोबाईलवर अचानक राज ठाकरेंचा Video Call आला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2022 12:53 PM

या व्हिडिओ कॉलवर प्रत्यक्ष राज ठाकरे आहेत हे बघून महाराष्ट्र सैनिकांच्या जल्लोषाला एकच उधाण आले

मालेगाव - सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे कुटुंबाची नवी पिढी बरीच चर्चेत आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर आदित्य ठाकरे यांनी राज्यभरात शिवसंवाद, निष्ठा यात्रा काढली आहे. तर दुसरे अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पुर्नबांधणीसाठी राज्याच्या दौऱ्यावर आहेत. अमित ठाकरेंच्या दौऱ्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. मुंबई, कोकणपासून सुरू झालेला हा दौरा आता उत्तर महाराष्ट्रात पोहचला आहे. 

सोमवारी अमित ठाकरे हे मालेगावच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी अमित ठाकरेंचे जंगी स्वागत करण्यात आले. अमित ठाकरे यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. तेव्हा अचानक अमित ठाकरेंच्या मोबाईलवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे(MNS Raj Thackeray) यांचा व्हिडिओ कॉल आला. मनसेच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यात म्हटलंय की, मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचे मालेगावमध्ये महाराष्ट्र सैनिकांनी अभूतपूर्व स्वागत केले. योगायोगाने त्याच वेळी राज ठाकरे यांचा अमित यांना मोबाईलवर व्हिडिओ कॉल आला. तेव्हा अमित ठाकरेंनी तिथे जमलेल्या महाराष्ट्र सैनिकांची राज ठाकरेंशी अनोख्या पद्धतीने भेट घडवून आणली. या व्हिडिओत राज ठाकरेंना पाहून कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करत हिंदूजननायक म्हणून राज ठाकरेंच्या नावाने घोषणा दिल्या. 

या व्हिडिओ कॉलवर प्रत्यक्ष राज ठाकरे आहेत हे बघून महाराष्ट्र सैनिकांच्या जल्लोषाला एकच उधाण आले. अनपेक्षितपणे आपल्या विठ्ठलाचं 'व्हिडिओ-दर्शन' झाल्यामुळे अनेकजण अक्षरशः शहारून गेले आणि मग सर्वांनीच "हिंदूजननायक राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो" आदी घोषणा देत मालेगाव दणाणून सोडले असं मनसेच्या ट्विटरमध्ये सांगण्यात आले. 

झोपी गेलेला जागा झाला..!, मनसेची आदित्य ठाकरेंवर टीकामनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या शुभहस्ते मुंबईतील ३० महाविद्यालयांत मनविसे युनिट उदघाटन झाल्यानंतर- शिवसैनिकांच्या निष्ठा तपासण्यासाठी रक्त तपासणी करणारे- pathologist आदित्य ठाकरे जागे झाले आहेत. पश्चिम उपनगरातील पाटकर किंवा निर्मल, गोखले महाविद्यालयांत आता शिवसेनेचा, युवासेनेचा बोर्ड लावून काहीही फायदा होणार नाही, हे त्यांना कुणीतरी सांगायला हवं. या महाविद्यालयांतील हजारो विद्यार्थी विद्यार्थिनींनी मनं अमितसाहेबांनी कधीच जिंकली आहेत", असं मनसे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी सांगत आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र डागलं. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेAmit Thackerayअमित ठाकरे