चेतन ननावरे मुंबई : दसरा आणि दिवाळी पाडवा या दोन मुहूर्तांवर सोनेखरेदी करण्यासाठी ग्राहकांना आतापासून आॅर्डर द्यावी लागणार असल्याने, राज्यातील सराफ बाजाराला गुरुवारच्या ‘घटस्थापने’च्या पार्श्वभूमीवर नवी झळाळी आली आहे. त्यामुळे बुधवारी सोन्याच्या भावात १५० रुपयांची, तर चांदीत ४०० रुपयांची वाढ झाली.सोन्याचा भाव ३० हजारांवर गेला आहे. तथापि, दस-यापर्यंत सोन्याचा दर कमी होण्याची शक्यता सराफ बाजाराचे प्रवक्ते कुमार जैन यांनी व्यक्त केली आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी सुरू होईल. सोन्याची नाणी आणि जुने दागिने मोडून नवे दागिने तयार करण्यासाठी ग्राहक बाजारात धाव घेतील. त्यामुळे घटस्थापनेनंतर ख-या अर्थाने सराफा बाजाराला अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा असल्याचे जैन यांनी सांगितले.>दसºयाच्या मुहूर्तावर यंदा सराफ बाजारातील व्यवसाय सुमारे २० टक्क्यांनी उसळी घेण्याची शक्यता आहे. रेराच्या अंमलबजावणीनंतर, घरांसाठी होणा-या गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून ग्राहकांचा कल सोन्याकडे असतो. त्यामुळे दस-याला ४०० कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे.- कुमार जैन, प्रवक्ते,मुंबई ज्वेलर्स असोसिएशन
दसरा आणि दिवाळी पाडवा या दोन मुहूर्तांवर सोने बाजाराला ‘नव’झळाळी; खरेदी वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 6:35 AM