शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

कुटुंबाची धुरा वाहताना तिचे सीमेवर कर्तव्य

By admin | Published: March 08, 2015 1:04 AM

दुसरीकडे दोन मुलींना संभाळत आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडून उत्कृष्ट कर्तव्यसेवा बजावणारी माझी मुलगी गेली १५ वर्षे सीमा सुरक्षा दलामध्ये काम करीत आहे.

पुंडलिक माने, उषा जाधवआपल्या नातेवाईक व मूळ गावापासून हजारो मैल दूर पंजाबच्या सीमेजवळ सतत युद्धजन्य परिस्थितीत किंवा अतिरेकी कारवायांच्या छायेखाली वावरणे... आणि दुसरीकडे दोन मुलींना संभाळत आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडून उत्कृष्ट कर्तव्यसेवा बजावणारी माझी मुलगी गेली १५ वर्षे सीमा सुरक्षा दलामध्ये काम करीत आहे. विशेष म्हणजे सुमारे एक हजार जवानांच्या या बटालियनमध्ये ती एकमेव महिला अधिकारी आहे. माझ्या मुलीने माझा देशसेवेचा वारसा पुढे चालवला, याचा मला विशेष अभिमान आहे. तिच्या कर्तृत्वाला एक पिता म्हणून माझा ‘सलाम’ आहे.बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थात बीएसएफ या देशातील सर्वात मोठ्या निमलष्करी दलामध्ये ३९ वर्षे सेवा बजावलेले पुंडलिक माने आपल्या मुलीबद्दल भरभरून बोलत होते. उषा लिंगराजन जाधव असे त्यांच्या मुलीचे नाव. पुरुषांच्या बरोबरीनेच लष्करी प्रशिक्षण घेऊन उषा या उपनिरीक्षक म्हणून ‘बीएसएफ’मध्ये ३० जून २००० रोजी भरती झाल्या. ग्वाल्हेर येथील प्रशिक्षण केंद्रात सहा महिने प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी राजस्थानमधील बिकानेर व अनूपगढ़, गुजरातमधील गांधीधाम, पश्चिम बंगालमधील रायगंज तसेच इंदूर आदी ठिकाणी काम केले.त्या सध्या पंजाबमधील १४० बटालियन येथे कार्यरत आहेत. संपूर्ण बटालियनच्या पगारासह त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार उषाच सांभाळतात. आणि आर्थिक व्यवहार सांभाळत असल्या तरी प्रतिकूल परिस्थितीत अन्य बीएसएफ जवानांसह खांद्याला खांदा लावून लढण्याची तयारी त्यांना नेहमीच ठेवावी लागते. वडिलांची बीएसएफमधली कारकीर्द पाहिल्यामुळे त्यांना लष्करामध्ये जाण्याची इच्छा निर्माण झाली होती. सुदैवाने त्यांचे पती लिंगराजन हेसुद्धा बीएसएफमध्येच तांत्रिक विभागात नोकरीला आहेत. लष्करामध्ये नोकरी करीत देशसेवेचा वसा जोपासणाऱ्या या दाम्पत्याला दोन मुली आहेत. शिवानी आणि गार्गी अशी त्यांची नावे आहेत. त्या जेव्हा नोकरीवर रुजू झाल्या तेव्हा स्त्रियांचे तेथील प्रमाण नगण्य होते.बीएसएफसारख्या दलामध्ये स्वत:चे करिअर घडविण्याचे स्वप्न पाहणारे तरुण खूप आहेत. परंतु मुलींचे प्रमाण मात्र खूपच कमी आहे. माने यांना तशा दोन मुली आणि एक मुलगा. परंतु त्यांची सर्वात मोठी मुलगी असलेल्या उषा यांनी त्यांच्या कुटुंबामधून कोणीतरी लष्करात जावे ही इच्छा पूर्ण केली. त्यांना आपल्या मुलीविषयी मोठा आदर आणि अभिमानही आहे. आपल्या मुलीविषयी ते सर्वांना आवर्जू$न सांगत असतात. एक हजार पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सीमेवर काम करणाऱ्या आपल्या मुलीबाबत मानेंसारख्या कणखर लष्करी अधिकाऱ्याचे मनही हळवे होते.बीएसएफमध्ये काम करायची संधी मिळणे ही अभिमानाची बाब ४कामाच्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थिती असल्यामुळे सहसा मुली या क्षेत्राकडे दुर्लक्ष करतात, मात्र माझे सर्व मुलींना सांगणे आहे, की तसा विचार करू नका. बीएसएफसारखी संस्था आणि त्यात काम करायची संधी मिळणे ही अभिमानाची बाब आहे. ४मी बीएसएफमध्ये आले तेव्हा तर मुलींसाठी हे क्षेत्र नसल्यातच जमा होते. आता काळ बदलला आहे. अगदी सीमेवरही मुलींना पाठवण्याचा निर्णय अधिकारी घेतात. ४महिलांवरचे वाढते अत्याचार बघता सर्व मुलींना लष्करी प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे आणि हे प्रशिक्षण घेऊन आपल्या देशासाठी चांगली सेवा करण्याचे ध्येय पूर्ण होत असेल तर ती संधी प्रत्येक मुलीने स्वीकारली पाहिजे.