ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. २ - संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला येथील ‘द्वारका उत्सव’ शुक्रवार, २ सप्टेंबर रोजी शहरात हर्षोल्लासात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातील मुख्य मार्गाहून सजविलेल्या व्दारकेची व बैलांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. या उत्सवात शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त हजेरी लावली.
पोळ्याच्या दुसºया दिवशी अर्थात पोळा करीला कमट्या व चमकिल्या कागदांपासून तयार केल्या जाणाºया उंच व सचित्र व्दारकेची मिरवणूक काढण्याची शहरात परंपरा आहे. ती यावर्षी देखील कायम ठेवण्यात आली. त्यानुसार, दरवर्षीप्रमाणे यंदाही परिसरातील शेतकºयांनी आपापल्या बैलांना सजवून व्दारका उत्सवात सहभाग नोंदविला. देवपेठ, काटिवेस, रमेश टॉकीज, दंडे चौक, तोंडगाव मस्जिद, माहुरवेस, ध्रुव चौक, राजनी चौक, नगर परिषद चौक, काटिवेसमार्गे बालासाहेब मंदिरावर व्दारका उत्सवाचा समारोप करण्यात आला.
दिंडी, भजनी मंडळ, लेझीम पथकाने या उत्सवात सहभागी होवून कलागुणांचे प्रदर्शन केले. कमट्या आणि चमकिल्या कागदांपासून तयार करण्यात आलेल्या व्दारकेवर पर्यावरण, प्राण्यांचे संरक्षण करण्यासंदर्भात संदेश देण्यात आला. शहरातील उत्सवांपैकी महत्वपूर्ण असणाºया व्दारका उत्सवादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वाशिम पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
व्दारका उत्सवाच्या यशस्वीतेसाठी देवपेठ, गणेशपेठ यासह इतर भागातील युवकांनी पुढाकार घेतला. दरवर्षीप्रमाणे यंदाही शांतता व सुव्यवस्था कायम ठेवत हा उत्सव पार पडला.
६१ वर्षांपासून जपली जातेय परंपरा
राज्यात प्रसिध्द असलेला वाशिम येथील व्दारका उत्सव यंत्रयुगातही तब्बल ६१ वर्षापासून साजरा करुन परंपरा जपली जात आहे.पर्यावरणाप्रती प्रत्येक व्यकितने जागृत रहावे व प्राणी मात्रांवर प्रेम करण्याच्या संदेश देणारा हा व्दारका उत्सव १९५४ पूवी सुरु करण्यात आला आहे. १९५४ मध्ये चंदू माळी व नामदेव मामा यांनी या उत्सवात सहभाग घेवून याला मोठयाप्रमाणात साजरा केला होता त्यानंतर तो याच पध्दतीने साजरा केल्या जावू लागला.
व्दारका मिरवणुकीत ‘झिंग झिंग झिंंगाट’
राज्यात प्रसिध्द असलेला वाशिम येथील व्दारका उत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये सैराट चित्रपटातील गित ‘झिंग झिंग झिंगाट’ने तरुणाई मध्ये उत्साह भरला होता.प्रत्येक चौकात आळीपाळीने सदर गित वाजत असतांना त्या गितावर तरुणाई थिरकतांना दिसून आली.