लोणावळा : मित्रंसमवेत फिरायला आलेल्या तरुणाचा मंगळवारी सायंकाळी भुशी धरणात बुडून मृत्यू झाला. विशाल दत्तात्रय उदगीरकर (29, रा. चिंचवड) असे मृताचे नाव आहे.
धनंजय चंद्रकांत साने, शुभम कैलास जाधव व भैरवनाथ जगन्नाथ जोगी या मित्रंसमवेत विशाल येथे फिरायला आला होता़ मंगळवारी सायंकाळी सातच्या ुसुमारास भुशी धरण परिसरात ते गेले.
विशाल धरणाच्या पाय:यांवरील बंधा:यावर उभा राहून पाणी पाहात होता. त्या वेळी पाय घसरून तो धरणात पडला़ विशालचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. (प्रतिनिधी)