बदलापूर : लिफ्टसाठी खणलेल्या खड्यात साठवलेल्या पाण्यात बुडून चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाची घटना शुक्रवारी घडली. या घटनेत संबंधित बांधकाम व्यावसायिकाने पिडीत कुटुंबियांना या संदर्भात कुणालाही काही न सांगण्याची धकमी दिली होती. मात्र दोन दिवसानंतर हे कुटुंब पोलीस ठाण्यात आल्यावर हा प्रकार उघड झाला. प्रवीण शिंदे असे या मुलाचे नाव आहे. तो याच इमारतीच्या रखवालीचे काम करणाऱ्या शिंदे दांपत्याचा मुलगा होता. मूळचे जालना जिल्ह्यातील असलेले फिकरा शिंदे आणि त्यांची पत्नी पवित्रा बदलापूर पूर्वेकडील चैतन्य संकुल परिसरात असलेल्या अरु णोदय या इमारतीच्या रखवालीचे तसेच इतर काम करतात. हे दांपत्य या इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणीच राहतात. इमारतीची लिफ्ट बसवण्यासाठी तळमजल्यावर सहा फूट खोल खड्डा खणला असून त्यामध्ये पाणी साठवले होते. आपली मुले लहान असल्याने एखादी दुर्घटना घडू शकते. या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात अशी विनंती या दांपत्याने संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडे केली होती. परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. शुक्र वारी दुपारी प्रवीण याचा लिफ्टमधील खड्डयातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. हा प्रकार घडल्यावर बांधकाम व्यावसायिकाने या पिडीत कुटुंबाला मदत करण्याऐवजी त्यांना निघून जाण्याची धमकी दिली. तसे न केल्यास हुसकावून लावण्याची धमकी दिली.
लिफ्टच्या खड्यात बुडून मुलाचा मृत्यू
By admin | Published: March 08, 2016 2:38 AM