ऑनलाइन लोकमतअहमदपूर, दि. 25 - अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयात ११ वीच्या वर्गात शिक्षण घेणारे तीन विद्यार्थी थोडगा येथील साठवण तलावात पोहण्यासाठी रविवारी दुपारी ३़३० वाजण्याच्या सुमारास गेले होते. तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने यात दोघांचा बुडून मृत्यू झाला.महात्मा गांधी विद्यालयात अबरार अहमद निसार शेख (वय १६, रा़ भाग्यनगर, अहमदपूर), मंगेश राजकुमार बावणे (वय १६, रा़ लातूररोड) व अमत प्रकाश सिंघवी हे तिघेजण ट्युशनचा वर्ग सुटल्यानंतर रविवारी दुपारी स्कूटीवरून थोडगा येथील साठवण तलावात पोहण्यासाठी गेले होते़ अबरार अहमद निसार शेख व मंगेश राजकुमार बावणे हे दोघेच तलावात उतरले़ तर अमत सिंघवी हा पोहता येत नसल्यामुळे पाळूवर बसून होता़ पोहत असताना अचानक अबरार आणि राजकुमार पाण्यात बुडू लागले़ दरम्यान, अमतने आरडा ओरड केली़ यावेळी तलावानजीक असलेले गणेश केंद्रे, अंगद मुंडे धावून आले़ या दोघांनी बुडत असलेल्या अबरार व मंगेशला वाचविण्याचा प्रयत्न केला़ मात्र तोपर्यंत हे दोघेही पाण्यात खोलवर बुडाले होते.दरम्यान, अहमदपूर नगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाला पाचारण केले़ रियाज पठाण, अजितकुमार, प्रकाश जाधव, कैलास सोनकांबळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तलावातील पाण्यातून अबरार शेख आणि राजकुमार बावणे या दोघांचे प्रेत बाहेर काढले. अहमदपूर येथील ग्रामीण रूग्णालयात प्रेतांचे शवविच्छेदन करण्यात आले़ याबाबत अहमदपूर पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू
By admin | Published: December 25, 2016 10:04 PM