शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
3
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
4
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
7
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
8
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
9
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
10
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
11
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
12
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
13
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
14
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
15
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
16
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
17
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
18
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
19
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
20
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा

‘ई-कचरा’ साठलाय, ‘नो टेन्शन’ !

By admin | Published: January 11, 2017 6:54 PM

भविष्यातील प्रदुषणात सर्वात मोठा घटक ठरु शकणा-या ‘ई-कच-या’चा धोका नागपुरलादेखील जाणवू लागला आहे. सर्वात जास्त ‘ई-कचरा’ तयार होणा-या देशांतील मोठ्या शहरांत नागपूर

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि.11 -  भविष्यातील प्रदुषणात सर्वात मोठा घटक ठरु शकणा-या ‘ई-कच-या’चा धोका नागपुरलादेखील जाणवू लागला आहे. सर्वात जास्त ‘ई-कचरा’ तयार होणा-या देशांतील मोठ्या शहरांत नागपूर दहाव्या क्रमांकावर आहे.  हीच बाब लक्षात ठेवून मैत्री परिवार, नागपूर महानगरपालिका व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोककल्याण समितीने पुढाकार घेतला आहे. संक्रांतीचा मुहूर्त साधून १५ जानेवारी रोजी उपराजधानीत ‘ई-कचरा मुक्त नागपूर’ या मोहिमेची सुरुवात करण्यात येणार आहे.
शहरातील विविध ठिकाणी ‘ई-कचरा’ संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे. मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष संजय भेंडे यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. यावेळी मैत्री परिवार संस्थेचे सचिव प्रमोद पेंडके, प्रा.विजय शहाकार, मकरंद पांढरीपांडे, विष्णू मनोहर हे प्रामुख्याने उपस्थित होते.
संपूर्ण वर्षभर ही समस्या सोडविण्यासाठी जनजागृती व कृतिकार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शिवाय शाळा-महाविद्यालयांचीदेखील मदत घेण्यात येणार आहे. संपूर्ण शहरात विविध ‘झोन’निहाय संकलन केंद्र उभारण्यात येतील. नागपूर मनपानेदेखील ई-कचरा संकलनासाठी जागा उपलब्ध करुन दिल्या आहेत. 
 
१५ जानेवारीपासून शंखनाद....
 
१५ जानेवारीपासून दक्षिण-पश्चिम नागपुरातून ई-कचरा संकलनाची सुरुवात होणार आहे. पत्रकार सहनिवास येथील साई श्रद्धा लॉन येथून मोहिमेचे उद्घाटन होईल. कामाच्या गोष्टी बाजूला सारुन उर्वरित ई-कचरा विघटनासाठी पुण्यातील एका कंपनीकडे पाठविण्यात येणार आहे. महिन्याचे पहिले ५ दिवस दुपारी १२ ते ४ या वेळेत शहरातील १० ‘झोन’मध्ये संकलन करण्यात येईल. सोबतच मैत्री परिवार संस्थेचीदेखील संकलन केंद्र प्रत्येक ‘झोन’मध्ये असतील. संकलनासाठी तांत्रिक तज्ज्ञ उपस्थित राहतील व सुरक्षेचीदेखील काळजी घेण्यात येईल. यात पोलीस विभागाकडूनदेखील सहकार्य मिळेल, अशी माहिती देण्यात आली.