पिंपरी : पूर्वी झालेल्या भांडणाची पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पाच जणांनी एका तरुणावर तलवारीने वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. माऊली हनुमंत उकली (वय २४, रा. महात्मा फुले वसाहत, भोसरी) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी माऊली आणि आरोपींचे किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. माऊलीने या भांडणाची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांकडे तक्रार दिल्याच्या कारणावरून आरोपींनी त्याला शिवीगाळ करून मारहाण केली. तलवारीने डोक्यात आणि हातावर वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी गोट्या, सचिन निगडे, अमोल लांडगे, सोन्या, गणेश आणि एक महिला (सर्व रा. महात्मा फुले वसाहत, भोसरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवशरण हनुमंत उकली (वय २४) याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाहन चोरी करणाऱ्या दोघांना अटकपिंपरी : शहरात विविध भागांतून दुचाकी चोरणाऱ्या दोन आरोपींना चिंचवड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश राजू बनपट्टी (वय २०, खराळवाडी), सिद्धार्थ कृष्णा माची (वय १९, रा. आकुर्डी) अशी त्या दोन आरोपींची नावे आहेत. गस्तीवर असलेल्या पोलिसांना दोन दुचाकी चोरटे संशयास्पदरीत्या वावरताना आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, ते सराईत असल्याची माहिती पुढे आली. अपघातात जखमी पादचाऱ्याचा मृत्यूसांगवी : औंध सर्वोपचार रुग्णालयाजवळ बीआरटी मार्गावर वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून पीएमपीच्या वाहनचालकाने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास ठोकर दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. बालाजी बापूराव चव्हाण (वय २७) असे मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी बसचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)> उत्पादन शुल्क विभागाची कारवाईवडगाव मावळ : उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पालखी मार्गालगतच्या हॉटेलांवर कारवाई केली. हॉटेलमधील बेकायदा मद्यसाठे जप्त केले. मद्याचे १८० मिलीचे एकूण ३९ बॉक्स जप्त करण्यात आले. त्यांची किंमत ८८ हजार ७१४ इतकी आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त सुनील चव्हाण व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क मोहन वर्दे ,तसेच उपअधीक्षक सुनील फुलपगार यांचे आदेशानुसार निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग दीपक परब यांनी कारवाई केली. सोमवारी रात्री सिद्धबेट, गोपाळपुराच्या मागे एका घरात बंद खोलीत देशी मद्याचे १८० मिलीचे एकूण ३९ बॉक्स आढळून आले. उत्पादन शुल्क विभागाची कारवाईवडगाव मावळ : उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पालखी मार्गालगतच्या हॉटेलांवर कारवाई केली. हॉटेलमधील बेकायदा मद्यसाठे जप्त केले. मद्याचे १८० मिलीचे एकूण ३९ बॉक्स जप्त करण्यात आले. त्यांची किंमत ८८ हजार ७१४ इतकी आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त सुनील चव्हाण व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क मोहन वर्दे ,तसेच उपअधीक्षक सुनील फुलपगार यांचे आदेशानुसार निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग दीपक परब यांनी कारवाई केली. सोमवारी रात्री सिद्धबेट, गोपाळपुराच्या मागे एका घरात बंद खोलीत देशी मद्याचे १८० मिलीचे एकूण ३९ बॉक्स आढळून आले.
पूर्ववैमनस्यातून तरुणावर वार
By admin | Published: June 29, 2016 1:36 AM